व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ओला रोडस्टर प्रो, एकदा चार्जिंग केल्यानंतर जाणार 500 किलोमीटर पेक्षा लांब.. पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ओला इलेक्ट्रिकने नवीन ओला रोडस्टर इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतामध्ये नुकतीच लॉन्च केली आहे. या पोस्टमध्ये आपण रोडस्टर इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत, रेंज आणि वैशिष्ट्ये याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया.

ओला इलेक्ट्रिक कंपनीने नुकतीच नवीन ओला रोडस्टर इलेक्ट्रिक मोटरसायकल भारतामध्ये लॉन्च केली आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक टू व्हीलर क्षेत्रामध्ये मोठा जम बसवला असून, त्यांची ही नवीन मोटरसायकल बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे.

ओला रोडस्टर 3 प्रकारांमध्ये उपलब्ध

ओला रोडस्टर इलेक्ट्रिक मोटर सायकल ओला कंपनीकडून 3 प्रकारांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. या 3 प्रकारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम रेंज आणि वेगवेगळ्या रायडिंग मोड्सचा समावेश करण्यात आला आहे. हे 3 ओला रोडस्टरचे प्रकार कोणत्याही ते आपण खाली पाहूया:

  • ओला रोडस्टर एक्स
  • ओला रोडस्टर
  • ओला रोडस्टर प्रो

या कारणांमुळे ओला रोडस्टर ठरणार आहे खास?

  • सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या इलेक्ट्रिक बाइक्स उपलब्ध होणार असल्यामुळे या बाईक्स पारंपारिकपेट्रोल बाईकच्या तुलनेत स्वस्त ऑपरेटिंग खर्च येणार आहे.
  • ओला रोस्टर टॉप व्हेरियंटमध्ये 579 किमी रेंज आणि 160 किमी/ता. वेग असणार आहे. त्यामुळे लांबचे अंतर सहज पार करता येणार आहे.
  • या बाईक्समध्ये मोठे डिस्प्ले स्क्रीन, कनेक्टिव्हिटी,ADAS आणि क्रूझ कंट्रोलसह स्मार्ट AI फीचर्स असणार आहेत.
  • शून्य कार्बन उत्सर्जन आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह स्वच्छ ऊर्जेचा वापर यामुळे या बाईक्स पर्यावरणपूरक असणार आहेत.
हे वाचा 👉  आता मिळवा ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला... असा करा अर्ज!

ओला रोडस्टर बाईकची वैशिष्ट्ये

ओला रोडस्टर एक्स

ओला रोडस्टर एक्स हा प्रकार प्रामुख्याने बजेट श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकल खरेदी करता येईल.

  • मोटर क्षमता: 11 किलोवॅट
  • बॅटरी पर्याय: 2.5kWh, 3.5kWh, 4.5kWh
  • वेग: 0-40km/h फक्त 2 मिनिटे 8 सेकंदात
  • कमाल वेग: 124km/h
  • रेंज: 200 किमी (टॉप व्हेरियंट)
  • ब्रेक सिस्टीम: कॉम्बी ब्रेक सिस्टीम
  • रायडिंग मोड्स: स्पोर्ट्स, नॉर्मल, इको
  • डिजिटल फीचर्स: 4.3 इंच LED Display, ओला मॅप्स, क्रूझ कंट्रोल,OTA अपडेट्स

ओला रोडस्टर

ओला रोडस्टर हा मिड-रेंज प्रकार आहे, जो उत्तम स्पीड आणि रेंज साठी कंपनीकडून विशेष डिझाईन करण्यात आला आहे.

  • मोटर क्षमता: 13 किलोवॅट
  • बॅटरी पर्याय: 3.5kWh, 4.5kWh, 6kWh
  • वेग: 0.40k/h फक्त 2 मिनिट 4 सेकंदात
  • कमाल वेग: 126km/h
  • रेंज: 248km
  • रायडिंग मोड्स: हायपर, स्पोर्ट्स, नॉर्मल, इको
  • डिजिटल फीचर्स: 6.8 इंच टचस्क्रीन, स्मार्ट वॉच ॲप, क्रूझ कंट्रोल,AI आधारित वैशिष्ट्ये

ओला रोडस्टर प्रो

ही बाईक ओला कंपनीकडून हाय परफॉर्मन्स चाहत्यांसाठी विशेष करून डिझाईन केली आहे. ओला रोडस्टर प्रो ही बाईक बाजारामध्ये सर्वोत्तम इलेक्ट्रिक बाइक ठरण्याची शक्यता आहे.

  • मोटर क्षमता: 52 किलोवॅट, 105 Nm टॉर्क
  • वेग: 0-40km/h फक्त 1 मिनिट 2 सेकंदात, 0-100km/h फक्त 1 मिनिट 9 सेकंदात
  • कमाल वेग: 160km/h
  • रेंज: 579km (IDC प्रमाणित)
  • डिजिटल फीचर्स: 10 इंच TFT टचस्क्रीन, अपसाइड-डाउन forx, ड्युअ-चॅनेल ABS,ADAS, ट्रॅक्शन कंट्रोल
हे वाचा 👉  pm suryaghar yojana 2024 in marathi | सूर्यघर योजनेअंतर्गत ७८ हजार रुपये सबसिडी सह 300 मोफत वीज मिळणार

ओला रोडस्टरची किंमत

ओला कंपनीने ओला रोडस्टरची किंमत तिच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार जाहीर केली आहे.

ओला रोडस्टर एक्स

  • 2.5kWh – ₹74,999
  • 3.5kWh – ₹84,999
  • 4.5kWh – ₹99,999

ओला रोडस्टर

  • 3.5kWh – ₹1,04,999
  • 4.5kWh – ₹1,19,999
  • 6kWh – ₹1,39,999

ओला रोडस्टर प्रो

  • 8kWh – ₹1,99,999
  • 16kWh – ₹2,49,999

ओला रोडस्टर कधी होणार विक्रीसाठी उपलब्ध?

ओला रोडस्टरच्या दोन प्रकारापैकी म्हणजेच ओला रोडस्टर एक्स आणि रोडस्टर या दोन बाईक 2025 पासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.

ओला रोड स्टार प्रो ही बाईक 2026 पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर ओला रोडस्टर च्या सर्व प्रकारांसाठी कंपनीकडून 8 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये ओला इलेक्ट्रिक कंपनीकडून भारतामध्ये नुकतीच ओला रोडस्टर बाईक लॉन्च केली गेली आहे,या बाईकची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहिली आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक बाइकमध्ये रुची घेत असाल तर ओला रोडस्टर बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page