व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

RBI ने केले या बँकेला बॅन व्यवहाराची शेवटची मुदत फक्त 29 फेब्रुवारी पर्यंत

नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत की तो विषय सर्वसामान्यांना चिंतेत टाकणार आहे. कारण ही बातमी आहे बँकेविषयी ज्या बँकेवर आरबीआय ने बंदी घातली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना किंवा त्या बँकेमध्ये ठेवी असणाऱ्यांना हा विषय खूपच चिंतेत टाकणारा आहे.

आपण बोलत आहोत पेटीएम बँक लिमिटेड या बँकेविषयी या बँकेवर आरबीआय ने कठोर कारवाई केली आहे. 29 फेब्रुवारी 2024 नंतर कोणताही ग्राहक खाते ,प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, वॉलेट आणि फास्टटॅग इत्यादीमध्ये ठेवी किंवा टॉपअप स्वीकारण्यास मनाई केली आहे. तर याविषयी आपण सदर लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

पेटीएम पेमेंट बँकेविषयी थोडक्यात….

पेटीएम पेमेंट बँक ही भारतातील एक डिजिटल बँक आहे जी पेटीएम द्वारे चालवली जाते. ही बँक 2017 मध्ये आरबीआय द्वारे लायसन्स प्राप्त झालेल्या अकरा पेमेंट बँकापैकी एक आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या बँकिंग विनीयमन अधिनियम 1949 च्या कलम 35a अन्वये पेटीएम बँकेची स्थापना करण्यात आली होती.

पेटीएम पेमेंट बँक ग्राहकांना बचत आणि चालू खाती डेबिट कार्ड मोबाईल रिचार्ज बिल भरणे पैसे पाठवणे आणि इतर अनेक अशा आर्थिक सेवा प्रदान करते.

हे वाचा-  शून्यातून उभा केली 2000 करोड रुपयांची कंपनी

पेटीएम पेमेंट बँकेचा मुख्य हेतू म्हणजे सर्वसामान्यांना सोयीसुविधा प्रदान करणे जेणेकरून त्यांना आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआय ने केलेली कारवाई

2022 मध्ये,रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पेटीएम पेमेंट बँकेवर काही बाबींचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारला होता या उल्लंघनांमध्ये डेटा स्टोरेज आणि मनी लॉन्ड्री प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणे यांचा समावेश होता.

याप्रकरणी आरबीआय ने एटीएम पेमेंट बँकेवर खालील कारवाई केली होती:

  • आरबीआय ने एटीएम पेमेंट बँकेवर एक कोटीचा दंड आकारला होता.
  • आरबीआय ने पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहकांना नोंदणी करण्यापासून रोखले होते.
  • आरबीआय ने पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डावर एक का प्रतिनिधीची नियुक्ती केली होती.

सदर कारवाई ही 2022 मध्ये केली होती पण पुन्हा एकदा 2024 मध्ये पेटीएम पेमेंट बँकेमध्ये आरबीआयला काही त्रुटी आढळून आढळून आल्यामुळे परत एकदा पूर्ण बंदी घातली आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या एका निवेदनात माहिती देताना असे म्हटले आहे की पेटीएम पेमेंट बँक नियमांचे सतत पालन न करणे आणि सामग्रीच्या संबंधित नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे असे रिझर्व बँक ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात सांगितले आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने असे म्हटले आहे की,24 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात प्रीपेड माध्यम, वॉलेट ,फास्टटॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादी मध्ये कोणत्याही प्रकारची ठेव किंवा क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप करण्याची परवानगी बंद केली जाणार आहे तसेच कोणतेही व्याज कॅशबॅक किंवा परतावा बँकेमध्ये जमा करता येणार नाही.

हे वाचा-  Jio ने लॉन्च केला 4G फोन 999 ला तर 5G फक्त 1499

बँकेच्या ग्राहकावर होणारा परिणाम?

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या गाईडलाईन नंतर एटीएम बँकेच्या अनेक ग्राहकांना त्यांच्या पेटीएम खात्याचे काय होणार याची काळजी सतावत आहे. सरळ भाषेत सांगायचे झाले तर जर तुमचे पेटीएम बँकेत खाते असेल तर ही तुमच्यासाठी निश्चितच सतावणारी बाब आहे. बँकेवर निर्बंध घालताना आरबीआयने असे आदेश दिले आहेत की ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय त्याच्या खात्यावरून पेटीएम बँकेतून पैसे काढू शकतो.

पेटीएम बँकेकडून तुमचे कोणतेही ई एम आय किंवा आणखीन कोणतेही व्यवहार जर प्रलंबित असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावेत.

आरबीआय ने बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे यापुढे बँक खात्यातील व्यवहार कोणताही ग्राहक करू शकणार नाही.

कारवाईनंतर तुम्ही कोणताही टॉप-अप करू शकणार नाही ना तुम्ही वॉलेट रिचार्ज करू शकणार नाही ना गिफ्ट कार्ड पाठवू शकणार नाही.

याशिवाय तुम्ही पेटीएम वरून फास्टटॅग रिचार्ज करू शकणार नाही.

पेटीएम हे फक्त यूपीआय पेमेंट साठी वापरले जाऊ शकते मात्र, यासाठी तुमचे खाते एटीएम बँकेत नसून दुसऱ्या कोणत्याही बँकेत असावे लागते.

29 फेब्रुवारी पर्यंत ग्राहकांना या असणार सवलती

29 फेब्रुवारी नंतर आरबीआय ने घातलेले नवीन निर्बंध पेटीएम बँकेवर लागू होतील त्यानंतर पेटीएम ग्राहकांचे खाते, वॉलेट ,प्रीपेड उपकरणे ,फास्टटॅग ,एनसीएमसी कार्डामध्ये कोणत्याही प्रकारची ठेव किंवा क्रेडिट व्यवहार शक्य होणार नाही. तत्पूर्वी ग्राहक त्यांच्या खात्यातील संपेपर्यंत सर्व सुविधा वापरण्यास सक्षम असतील.

हे वाचा-  साताऱ्यातील तरुणाने उभी केली , 10000 करोड रुपयांची कंपनी

29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम बँक खातेदारांना किंवा वापर करतांना यूपीआय आणि बीबीपीओयु यासारख्या सेवा वगळता अन्य कोणत्याही सेवा उपभोक्ता येणार नाहीत.

तत्पूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने पी पी एल ला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ दिला आहे या कालावधीत सर्व व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील असा आदेश आरबीआय ने काढला आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment