व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये लाभार्थ्यां यादीत तुमचे नाव पहा

पी एम किसान सन्मान निधी योजना :-केंद्र सरकार अशा बऱ्याच योजना चालू करत असते की ज्याचा लाभ सामान्य लोकांनी घेतला पाहिजे. ज्याचा लाभ सध्याच्या वेळेला बरेच लोक मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

या योजनांमध्ये बऱ्याच प्रमाणात विमा घरकुल रेशन पेन्शन बऱ्याच प्रकारच्या योजना केंद्र शासन चालू करत असते ज्याचा लाभ सामान्य माणसांनी घ्यावा. या योजनांमध्ये एक योजना शेतकऱ्यांसाठी आहे ज्याचे नाव आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षभरात दोन दोन हजार रुपये असे तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत आणि आत्तापर्यंत केंद्रशासनाकडून 15 हप्ते हे शेतकऱ्यांना पाठवले गेले आहेत.

व आता थोड्याच दिवसात सोळावा हप्ता देखील जमा होईल असे वाटते पण तुम्ही जर कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर हा आता तुमचा येणार नाही त्यामुळे तुम्ही याचा लाभ घेण्यासाठी पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल की तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का नाही. तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला तुमचे स्टेटस चेक करणे गरजेचे आहे.

आतापर्यंत या योजनेचे वितरण करण्यात आले त्यामध्ये एक कोटी पाच लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे .या योजनेची सुरुवात एक डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले आहे .28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेच्या वितरण करण्यात आले आहे.

हे वाचा-  लाडका शेतकरी योजना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवीन घोषणा

या योजनेसाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

⚪ लाभार्थी शेतकरी कुटुंबाकडे दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असावे.

⚪ लाभार्थी शेतकरी भारताचा नागरिक असावा.

⚪ लाभार्थी शेतकरी कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना त्याचा आधार कार्ड, बँक पासबुक ,आणि शेतजमीन मालकीचा पुरावा सादर करावा लागतो अर्ज ऑनलाईन केव्हा ऑनलाईन पद्धतीने करता येतो.

आपला गावातील पीएम किसान सन्मान योजनेची यादी कसे पहावे.

स्टेप 1

⚪ जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चा लाभ मिळत आहे का नाही हे पाहण्यासाठी व तुम्हाला सोळावा हप्ता मिळणार की नाही.

⚪ तरी या योजनेची अधिकाधिक माहिती बघण्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईटवर चेक करावे लागेल pmkisan.gov.in.

स्टेप 2

⚪ जर तुम्ही किसान पोर्टल उघडाल तर त्यावर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील.

⚪ तुम्हाला थोडे खालील बाजूला जाऊन तेथे बेनेफिशियर लिस्ट वाला ऑप्शन दिसेल.

⚪ या ऑप्शन वर तुम्ही क्लिक करा.

स्टेप 3

⚪ यानंतर तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव याचे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा.

⚪ यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स या ऑप्शन वर क्लिक करा.

⚪ यानंतर तुमच्यापुढे एक लिस्ट येईल ज्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचे नाव तुम्ही चेक करू शकता.

आधार कार्ड नंबर टाकून आपला वैयक्तिक हप्ता जमा झाला आहे का नाही ते कसे पहावे.

⚪ पी एम किसान योजनेची खालील वेबसाईट ओपन करा:https//pmkisan.gov.in/

हे वाचा-  कुक्कुटपालनासाठी सरकारकडून मिळत आहे 33 टक्के अनुदान, असा करा अर्ज | poultry pharming subsidy scheme

⚪ “फार्मर्स कॉर्नर” क्लिक करा.

⚪ “लाभार्थी स्थिती “लिंक वर क्लिक करा.

⚪ आपला “आधार क्रमांक” आणि” captcha “कोड प्रविष्ट करा.

⚪ “प्राप्त “बटनावर क्लिक करा.

यामुळे आपल्याला आपला पीएम किसान लाभार्थी स्थिती दर्शवणारी एक विनंती पृष्ठ मिळेल या पृष्ठावर तुम्हाला खालील माहिती दिसेल:

⚪ लाभार्थी नाव

⚪ आधार क्रमांक

⚪ बँक खाते क्रमांक

⚪ शेत जमीन क्षेत्र

⚪ हप्ता

⚪ पैसे जमा झाले की नाही

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही खालील कारणांसाठी तपास करू शकता.

⚪ तुमचा बँक खाते क्रमांक चुकीचा असू शकतो.

⚪ तुमचा आधार क्रमांक चुकीचा असू शकतो.

⚪ तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असू शकतो.

⚪ तुमच्या बँक खात्यात ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

जर तुम्ही यापैकी कोणत्याही कारणास्तव तुमचे पैसे मिळू शकत नसाल. तर तुम्ही तुमच्या जिल्हा कृषी अधिकारी किंवा पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइनची संपर्क साधू शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page