पी एम किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी 6 हजार रुपये वार्षिक लाभ मिळवत आहेत. यामुळे आपणही आपल्या घरातील व्यक्तींची पी एम किसान योजनेसाठी नाव नोंदणी करून प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळू शकतात.
यासाठी आपण घरातील मुलगा, वडील, आई अशा कोणालाही आपण या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतो. फक्त ती व्यक्ती पीएम किसान योजनेच्या पात्रतेमध्ये बसायला हवी. व त्या व्यक्तीच्या नावे सातबारा वर किमान पाच गुंठे जमीन असायला हवी.
Pm Kisan New Registration : शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे,जर पीएम किसान योजनेमध्ये जर आपलं नाव नसेल तर यापुढे आपण पी एम किसान योजनेमध्ये नाव नोंदणी करू शकतात, यासाठी राज्य शासनाच्या वतीने शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे. या शासन निर्णयाद्वारे आपण अर्ज कशा पद्धतीने करणार आहात व आपल्याला जर समस्या निर्माण झाली तर आपण कोठे माहिती उपलब्ध करावी याबद्दलचे सर्व माहिती आपण आजच्या लेखांमध्ये सादर करणार आहोत, शेतकरी बंधुनो हा लेख अवश्य वाचा व आपल्याला पी एम किसान सन्मान निधी मध्ये कसं पात्र होता येईल याबद्दलची माहिती जाणून घेऊया, याव्यतिरिक्त आपण पीएम किसान योजनेमध्ये पात्र झाल्याच्या नंतर सीएम किसान योजनेमध्ये देखील आपल्याला लाभ मिळणार आहे तर यासाठी सर्व माहिती आपण जाणून घेऊया. Pm Kisan New Registration
पीएम किसान योजनेसाठी पात्रता निकष
पीएम किसान योजनेच्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक पात्रता आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. येथे मुख्य निकष आहेत
- जमिनीची मालकी: पहिला पात्रता निकष म्हणजे जमिनीचा ताबा. ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन आहे तेच या योजनेसाठी पात्र आहेत. भाडेकरू शेतकरी आणि जे इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करतात ते यासाठी पात्र नाहीत.
- जमीनधारणा आकार: 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले छोटे आणि सीमांत शेतकरी पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या योजनेचा उद्देश सर्वात गरजू शेतकऱ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांना प्रचंड आर्थिक मदत देणे आहे.
- व्यावसायिक श्रेणी: PM किसान योजना सर्वसमावेशक आहे आणि इतर सर्व श्रेणीतील शेतकऱ्यांना समाविष्ट करते. वैयक्तिक शेतकरी, शेतीच्या कामात गुंतलेल्या कुटुंबांव्यतिरिक्त, देखील या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- वयाच्या आधारावर कोणतेही अपवर्जन नाही: इतर अनेक कल्याणकारी योजनांच्या तुलनेत पंतप्रधान किसान योजनेत पात्रतेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. या योजनेअंतर्गत सर्व वयोगटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते.
पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना?
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु, या योजनेसाठी सर्वच शेतकरी अर्ज करू शकतात. सरकारने सुरवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. परंतु, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी 4 महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जातात.
या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स लागते. सीएससी म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरमध्येही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र येथे नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते.
शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसेच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
अशी करा ऑनलाइन नोंदणी
ऑनलाइन नाव नोंदणी करण्यासाठी बटन वर क्लिक करा.
- ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अगोदर तुम्हाला pm kisan असं गूगलवर सर्च करावे लागेल. त्यानंतर PM-Kisan Samman Nidhi ची वेबसाइट तुमच्यासमोर ओपन होईल.
- त्यानंतर उजवीकडे तुम्हाला “फार्मर कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की 7 पर्याय तुमच्यासमोर येतील. त्यातील पहिलाच पर्याय आहे New Farmer Registration.
- या पर्यायावर क्लिक केलं की ‘New Farmer Registration form’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- येथे तुम्हाला आधार क्रमांक आणि captcha टाकायचा आहे.
- त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केलं की Record not found with given details असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. तुम्हाला या मेसेजखाली असलेल्या “ओके’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला “Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?’ असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे जमा नाही, तुम्हाला PM-Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं आहे का, असा होतो. त्याखाली असलेल्या YES या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर एक पानी रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- यात सुरवातीला state म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर district म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे sub-district आणि block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.
- त्याखाली farmer name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, एकदम तंतोतंत तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही.
- पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे.
- त्यानंतर फार्मर टाईपमध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity proof number आपोआप जनरेट होतो.
- आता पुढे तुम्हाला तुमच्या बॅंक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बॅंकेचा IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बॅंकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर पत्ता टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या झालं आहे.
- यानंतर Farmers other details यात शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे. यात मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे.
- त्यानंतर Land Holding यात जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.
- आता येथे तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा येथे टाकायचा आहे.
- हे टाकून ऍड बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते.
- आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.
- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “[X]I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या चौकटीला टिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्ही Self -Declaration Form वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते.
- सगळ्यात शेवटी “सेव्ह’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, ——- हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरीत्या नोंदणी केली आहे. पुढील मंजुरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.
- एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतराने तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.
- त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील status of self registered or csc farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि captcha टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तिथं पाहायला मिळतं. यात सगळ्यात शेवटी नोंदणीची तारीख आणि फॉर्मचं स्टेटस दिलेलं असतं.