व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

यंदा दिवाळीत पण पाऊस पडणार का ? पुढील महिन्याचा हवामान अंदाज काय सांगतो पहा.

Diwali Rain : मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून माघारी फिरला आहे. नैऋत्य मौसमी पाऊस देशातून माघारी फिरला आहे तर दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये सध्या ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय असून त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मौसमी पाऊस बरसत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पाऊस आणि महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे.

मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नक्कीच काही भागात कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने या पावसाचा तेथील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी हा अवकाळी पाऊस देखील फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे खरीप हंगामातील पिके, कांदा तसेच फळबागांवर मोठा विपरीत परिणाम होईल अशी भीती सुद्धा आहे.

तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा आहे ते पहा. 👇

दुसरीकडे मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता का वाढली, मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रात पाऊस का होतोय असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दरवर्षी ऑक्टोबर महिना सुरू झाला की तापमानात वाढ होत असते.

हे वाचा-  TRAI New Rule: 1 सप्टेंबरपासून हे सिम कार्ड्स होतील ब्लॅकलिस्ट, जाणून घ्या trai चा नवीन नियम.

ऑक्टोबर मध्ये पावसाळा

ऑक्टोबर महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणतात. अर्थातच पावसाळा संपूर्ण हिवाळा सुरू होण्याचा हा काळ असतो. यामुळे या काळात तापमानात मोठी वाढ होते. यंदा सुरुवातीपासूनच ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे जमिनीसह वातावरणातील आर्द्रता वाढली.

त्यामुळे पाण्याचे ढगात रूपांतर होऊन राज्यातील विविध भागांत दररोज रात्री धो धो पाऊस कोसळत असल्याची माहिती हवामान खात्यातील तज्ञांनी दिली आहे. अशा या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या मनात यंदा दिवाळीतही पाऊस पडणार का असा सवाल येणे साहजिक आहे. दरम्यान याच संदर्भात आता भारतीय हवामान खात्याकडूनही मोठे स्पष्टीकरण समोर आले आहे.

यंदा दिवाळीत पण पाऊस पडणार का?

हवामान खात्यातील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 31 अंशापर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद होत असल्याची माहिती समोर येत आहे.

तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा आहे ते पहा. 👇

त्यामुळे ओल्या जमिनीतील बाष्प आणि वातावरणातील बाष्प यांच्यामुळे ढगांची निर्मिती होत असून याच पावसाच्या ढगांमुळे सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे. हा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन होत आहे.

त्यामुळे पावसाचे प्रमाण हे असमान जाणवते. अर्थातच काही गावांमध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक दिसते तर काही ठिकाणी पावसाची तीव्रता ही फारच कमी भासते. दरम्यान यंदा दिवाळीपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. म्हणजेच यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करावी लागणार असे दिसते.

हे वाचा-  आपल्या गावाची रेशन कार्ड यादी पहा तमच्या मोबाईलवर | Village wise ration card list.

यावर्षी दिवाळीतही पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याचा हाच अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment