व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

ई-पीक पाहणी (e-pik pahni app)- शेतकऱ्यांनी स्वतः शेतातल्या पिकांची नोंद सातबारावर करा तेही स्वतःच्या मोबाईलवर.

शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.

तुमच्या सातबारा वर पीक नोंदवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇

सातबारावर (land record) आपण घरच्या घरी पीक नोंद करू शकता.

ही नोंद करण्यासाठी राज्य सरकारनं ई-पीक पाहणी नावाचं ॲप विकसित केलं आहे.

त्यामुळे ई-पीक पाहणी ॲप काय आहे, ते कसं वापरायचं आणि याचे इतर फायदे काय आहेत, ते आता जाणून घेऊया.

अशी करा पिकांची नोंद

ई-पीक पाहणी ॲपवर वापरून पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करायचं आहे.

ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

ई-पीक पाहणीचं व्हर्जन-2 वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्स्टॉल वर क्लिक करायचं आहे.

इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

हे वाचा-  चुंबकाचा वापर करून वीज चोरी करता येते का पहा | Magnet on electricity meter

त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. याला डावीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.

ई-पीक पाहणी

पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.

त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे आणि मग नवीन खातेदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इथं सुरुवातीला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून पुढे जायचं आहे.

मग पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता. इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.

मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा नावाचं पेज ओपन होईल.

ई-पीक पाहणी

आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.

हे वाचा-  घरकुल यादी मोबाईल वर कशी पहावी ?| Gharkul Yadi Kashi Pahavi

इथल्या हो या पर्यायावर क्लिक करा. मग खातेदाराचं नाव निवडा. सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा आणि मग सांकेतांक क्रमांक टाका.

आता पीक पाहणीच्या ॲपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.

पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.

एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.

ई-पीक पाहणी

पुढे अक्षांश रेखांश मिळवा वर क्लिक करायचं आहे. आणि मग शेवटी फोटो काढावर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.

फोटो काढून झाला की बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली, ती तुमच्यासमोर दाखवली जाईल. त्याखालच्या स्वयंघोषणेवर तुम्हाला क्लिक करून पुढे जायचं आहे.

पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे म्हणायचं आहे.

हे वाचा-  सरकारकडून मुलीच्या विवाह साठी मिळणार तब्बल 51 हजार रुपये, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणार लाभ |Bandhkam Kamgar Yojana 2024

त्यानंतर पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.

अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.

अशाचप्रकारे या ॲपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.

ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇

माहिती नोंदवल्यावर पुढे काय होतं?

शेतातल्या पिकांची माहिती पीक पाहणी अपवर नोंदवल्यानंतर या माहितीचं पुढे काय होतं, यावर काय प्रक्रिया होतं? या प्रश्नावर ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे सांगतात, “शेतकऱ्यांनी या अपवर पिकांची नोंद केल्यानंतर ती नोंद 48 तास कुठेही सातबाऱ्यावर पाठवत नाही. 48 तास ती नोंद दुरुस्तीसाठी दिलेले आहेत. मात्र त्यानंतर ही नोंद गाव नमुना बारावर प्रतिबिंबित करतो आणि मग ती गाव नमुना बारावर दिसायला लागते.”

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment