व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

शेतजमिनीचा 7/12 महाभुलेख पोर्टलवरून मोफत कसा पाहायचा? ते जाणून घ्या.! | Satbara online Maharashtra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या देशाची जागतिक स्तरावर एक कृषिप्रधान देश म्हणून ओळख आहे. देशातील जवळपास 50% पेक्षा जास्त लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. शेती संबंधित दस्तावेज हा ही एक महत्त्वाचा भाग आहे. कारण हे दस्तावेज शेती संबंधित संपूर्ण माहिती दर्शवत असतात. त्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणजे 7/12 होय.

7/12 व अन्य दस्तऐवजांसाठी गावातील ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयामध्ये जावे लागते. परंतु डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत शेती संबंधित सर्व दस्तावेज आता सरकारच्या माध्यमातून ऑनलाइन मिळत आहेत. सदर लेखामध्ये आपण शेतजमीन विषयक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ज्या दस्ताऐवजाकडे पाहिले जाते तो म्हणजे 7/12 होय. हा 7/12 डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सरकारच्या पोर्टलवरून ऑनलाईन कसा पाहता येतो? याबाबतची सर्व माहिती आपण खाली पाहूया.

7/12 विषयी थोडक्यात..

7/12 हा शेत जमिनी संबंधित एक दस्तावेज आहे. जो महाराष्ट्र व गुजरात सरकारच्या महसूल विभागाने भारतातील राज्यांच्या भूसंपत्ती नोंदणीतून काढलेला एक आराखडा आहे. या 7/12 मधील 7 हा नंबर अधिकार अभिलेख आहे तर, 12 नंबर पीकपेरे दर्शवतो. ही दोन्ही मिळून 7/12 तयार होतो. त्यालाच आपण 7/12 उतारा असे म्हणतो.

7/12 उताऱ्यामध्ये जमिनीचा प्रकार, मालकी हक्क, जमिनीचे क्षेत्रफळ, खरेदी-विक्रीच्या नोंदी, भूमापन क्रमांक, गाव, तालुका, जिल्हा, जमिनी मध्ये लागवड केलेल्या पिकांची नोंद या सर्व बाबींचा समावेश असतो.

हे वाचा 👉  फ्लॅट किंवा जमीन – कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय. Flat or land, where to invest? Lets know.

महाभुलेख पोर्टल/वेबसाईट

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित कोणतेही माहिती मिळवण्यासाठी डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत एक अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटची लिंक आपण खाली दिली आहे. 👇🏼👇🏼      https://bhulekh.mahabhumi.gov.in

महाभुलेख पोर्टलवरून किंवा वेबसाईटवरून राज्यातील सर्व शेतकरी आणि नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व माहिती पाहू शकतात. यामध्ये 7/12, 8-अ उतारा, जमिनीचा नकाशा, मालमत्ता पत्रक या प्रकारची जमीन विषयक सर्व दस्तऐवज.

महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्याला जमीन विषयक त्याच्या आवश्यकतेनुसार माहिती मिळू शकते. या पोर्टलवरून माहिती सामायिक करण्यासाठी पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद हे 6 मुख्य विभाग आहेत. राज्यातील सर्व  (358) तालुक्यातील 7/12 डिजिटल करण्यात आले आहेत.

वरील पोर्टलवरून शेत जमीन विषयक संपूर्ण माहिती ऑनलाईन मिळत असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याचे आवश्यकता नाही. या पोर्टलवर जमीन संबंधित सर्व माहिती तुम्ही घरबसल्या मिळवू शकता.

जमिनीचा 7/12 ऑनलाईन कसा पाहायचा?

जमिनीचा 7/12 उतारा महाभुलेख पोर्टल वर जाऊन ऑनलाईन कसा पाहायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहू:

  • सर्वप्रथम तुम्हाला महाभुलेख च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला डावीकडे महाराष्ट्राचा नकाशा आणि उजवीकडे लोगो व त्याखाली विभाग निवडीचा पर्याय दिसेल.
  • महाराष्ट्रातील सहा विभागापैकी तुमची जमीन कोणत्या विभागात आहे त्या विभागाला सिलेक्ट करून Go वर क्लिक करा. तुम्ही निवडलेल्या विभागाचे नाव स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर आपणाला या ठिकाणी फक्त 7/12 पहायचा आहे, म्हणून 7/12 व 8-अ यापैकी 7/12 निवडा.
  • त्यानंतर तुमच्या जमिनीशी संबंधित विभाग अंतर्गत येणारा जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • नंतर जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, मालकाचे नाव-मधले नाव-आडनाव यापैकी एक माहिती नमूद करून तुमचा मोबाईल क्रमांक टाईप करा
  • वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर कॅप्च्या दिसेल, तो कॅप्च्या जसाच्या तसा अचूक टाका.
  • कॅप्च्या व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर संबंधित जमिनीचा 7/12 उतारा स्क्रीनवर दिसेल.
हे वाचा 👉  7/12 उताऱ्यामध्ये पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी महसूल विभागाकडून केले महत्त्वपूर्ण ११ बदल, जाणून घ्या ११ बदल कोणते आहेत ते.?

अशा पद्धतीने तुम्ही महाभुलेख पोर्टलवरून 7/12 उतारा पाहू शकता.

सदर लेखामध्ये आपण शेतजमिनीचा 7/12 उतारा ऑनलाइन महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून कसा पाहायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा 7/12 उतारा वरील माहितीच्या आधारे पाहू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page