व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीला अधिक सुरक्षित करण्यासाठी एक नवं सिक्युरिटी फीचर आणलं आहे. या फीचरमुळे आता वापरकर्त्यांना आपला फोन नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. यासाठी कंपनीने युजरनेम आधारित सिस्टम विकसित करण्याची तयारी केली आहे.
युजरनेम फीचरचे महत्व
युजरनेम फीचरच्या माध्यमातून Whatsapp वापरकर्ते आता आपला फोन नंबर लपवून ठेवू शकतात आणि त्यांच्या युजरनेमद्वारेच WhatsApp वर संपर्क साधू शकतात. हे फीचर खासकरून नवीन लोकांशी संवाद साधताना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ज्यांच्याकडे आधीच तुमचा नंबर आहे, त्यांना मात्र हे फीचर लागू होणार नाही.
पिन कोडमुळे आणखी सुरक्षितता
युजरनेम फीचर अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनीने ऑप्शनल पिन कोडचा समावेश केला आहे. हा पिन कोड वापरकर्त्यांना युजरनेमला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल. चार अंकी पिन कोडमुळे तुमचा युजरनेम आणि फोन नंबर अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षित राहील. पिन कोड शेअर करताना दोन-स्तरीय व्हेरिफिकेशनसारखी खासगी माहिती शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नवीन मेसेजेसवर नियंत्रण
WABetaInfo वेबसाईट च्या माहितीनुसार, अनोळखी नंबरवरून येणारे मेसेजेस आता थेट मिळणार नाहीत. पिन कोड नसलेल्यांना तुमच्या युजरनेमवर मेसेज पाठवता येणार नाही. तुम्ही पिन कोड शेअर केल्यानंतरच त्यांचे मेसेजेस मिळू शकतात. हे फीचर विशेषतः अनोळखी व्यक्तींना संपर्क करताना उपयुक्त ठरणार आहे.
हे फीचर सध्या Beta टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच हे फीचर जगातील सर्व देशांतील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. कंपनीने वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीसाठी या फीचरमध्ये अनेक सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आहेत, ज्यामुळे व्हॉट्सअॅपवरील संवाद अधिक सुरक्षित होणार आहे.