व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

रेल्वे येण्यापूर्वी रुळावर जिवंत कोंबडी, सिलिंडर ठेऊन व्हिडिओ काढत होता हा Youtuber

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आजच्या सोशल मीडिया युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात, आणि याचा अलीकडेच आणखी एक गंभीर उदाहरण उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये समोर आले आहे. गुलझार शेख नावाच्या एका २४ वर्षीय युट्यूबरला रेल्वे ट्रॅकवर धोकादायक वस्तू ठेवून व्हिडीओ बनवण्यासाठी अटक करण्यात आली आहे.

गुलझार शेखने गॅस सिलिंडर आणि जिवंत कोंबडीसारख्या वस्तू रेल्वे ट्रॅकवर ठेवून व्हिडीओ तयार केले होते, ज्यामुळे हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि त्याला तातडीने अटक केली.

गुलझार शेखने हे व्हिडीओ ‘लाल गोपालगंज’ या ठिकाणी चित्रीत केले होते आणि ‘ट्रेन्स ऑफ इंडिया’ या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर त्याचे व्हिडीओ शेअर केले गेले. या पोस्टमध्ये रेल्वेच्या अधिकृत हँडलला टॅग करून गुलझारवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

प्रयागराजमध्ये युट्यूबर गुलझार शेखला अटक

रेल्वे सुरक्षा दलाने गुलझार शेखला खंडौली गावातून अटक केली असून त्याच्या विरुद्ध रेल्वे कायद्यातील कलम १४७, १४५, १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीआरएम लखनौ यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आरोपीवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.

भाजपा प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी देखील गुलझार शेखच्या व्हिडीओंवर आक्षेप घेतला आहे आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, रेल्वे अपघातांना कारणीभूत ठरणारे घटक राष्ट्रद्रोही असतात, आणि गुलझार शेखच्या कृत्यामुळे रेल्वे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे वाचा 👉  जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट हरवले असेल किंवा सापडतं नसेल तर घरबसल्या कसे मिळवायचे,असा करा अर्ज.. birth certificate online apply

गुलझार शेखच्या ‘गुलझार इंडिया हॅकर’ नावाच्या युट्यूब चॅनेलवर २४३ व्हिडीओज असून, त्याच्या चॅनेलला २ लाख ३५ हजार Subscriber आहेत. त्याच्या व्हिडीओंना 150 लक्ष Views मिळाले आहेत. या घटनेनंतर त्याच्या चॅनेलवरून अनेक व्हिडीओज काढून टाकले गेले आहेत.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केवळ Views आणि लाईक्सच्या मागे न लागता जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. गुलझार शेखच्या धोकादायक कृत्याने समाजात एक गंभीर संदेश दिला आहे की अशा प्रकारच्या कृतींनी केवळ आपला जीवच नाही तर इतरांच्याही जीवाला धोका पोहोचू शकतो.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page