व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Farm Loan: 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत पहा.

जमिनीवर कर्ज

Farmer Loan :- शेतीसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.कारण जर हातात पैसा नसला तर शेतीची कामे वेळेवर करता येत नाही व त्याचा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज ही खूप महत्त्वाची बाब आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पिक कर्जाला खूप मोठे महत्त्व आहे.

तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. परंतु बँकांच्या माध्यमातून दिले जाणारे पीक कर्ज मात्र वेळेवर शेतकऱ्यांना बऱ्याचदा मिळत नाही. या सगळ्या पीक कर्जाच्या किंवा इतर कर्जाच्या पार्श्वभूमीवर जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रानुसार बँक कर्ज देत असते.

साधारणपणे एक एकर क्षेत्रावर किती कर्ज मिळू शकते? हे एक माहितीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना माहित असणे देखील तितकेच गरजेचे आहे. म्हणून या लेखामध्ये शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज व किसान क्रेडिट कार्ड चे फायदे जाणून घेणार आहोत.

एक लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

 एक एकर जमिनीवर किती कर्ज मिळू शकते  ते कसे मिळते?

हे वाचा-  १८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

साधारणपणे जमिनीच्या क्षेत्रनिहाय विचार केला तर एक एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 30 हजारापर्यंत कर्ज मिळते. परंतु जर शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर या माध्यमातून किमान 50 ते कमाल तीन लाखापर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे. म्हणजेच एका एकर करिता तीस हजार व जास्तीत जास्त दहा एकर जमीन असेल तर तीन लाख कर्ज मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे.

शेतकऱ्याला मिळणाऱ्या कर्जाचे स्वरूप हे त्याचे उत्पन्न तसेच त्याचे जमिनीचे क्षेत्रफळ व गेल्या वर्षीचे पीक यावर अवलंबून असते. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना वार्षिक सात टक्के व्याज दराने कर्ज मिळते. तसेच महत्त्वाचे म्हणजे जर वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्याला सात टक्के व्याज दरात तीन टक्के सवलत सरकारच्या माध्यमातून दिली जाते म्हणजे शेतकऱ्यांना फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज परतफेड करावे लागते. जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळतो.

मोबाईल वर एक लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

 किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

1- तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्ड करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कोणत्याही सरकारी बँकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला जाणे गरजेचे आहे.

हे वाचा-  Voter स्लिप घरी न आल्यास घरबसल्या करता येनार डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती. | Voter slip download

2- त्या ठिकाणी केसीसी रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करून संपूर्णपणे फॉर्म भरून घ्यावा लागतो.

3- फॉर्ममध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घ्यायचे आहे व कोणत्याही स्वरूपाची चुकीची माहिती न भरता लागणारे सर्व कागदपत्रे स्कॅन करून घ्यावीत व व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.

4- जेव्हा तुम्ही कागदपत्रे अपलोड कराल तेव्हा फॉर्मच्या खाली तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

 किसान क्रेडिट कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

1- याकरिता तुम्हाला सर्वात जवळच्या तुमच्या सरकारी बँकेत जावे लागेल.

2- बँकेत गेल्यानंतर तुम्हाला बँकेतील अधिकाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड साठी विचारणा करावी लागेल.

3- त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्डसाठी दिला गेलेला फॉर्म तुम्हाला भरावा लागेल.

4- त्या फॉर्मवर विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरणे गरजेचे असून यामध्ये तुम्हाला तुमचा नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकणे गरजेचे आहे.

5- फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे त्याला जोडावीत.

6- त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे बँकेचे अधिकारी कडे द्यावेत.

7- त्यानंतर बँकेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड करिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

8- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पीड पोस्ट च्या माध्यमातून तुमच्या घरी किसान क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

हे वाचा-  स्मार्ट प्रीपेड मीटर कोणत्या पद्धतीने कार्य करते | how electric smart meter works

 किसान क्रेडिट कार्डकरिता लागणारे कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्हाला मतदान कार्ड तसेच आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पासपोर्ट साईज फोटो आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जमिनीचा सातबारा व खाते उतारा आवश्यक असतो.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment