व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पहायचा? जाणून घ्या, गावाचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची संपूर्ण माहिती! | Village land map download online

Village land map download online : नमस्कार,गावाचा नकाशा पाहणे हे एखाद्या व्यक्तीला गावाची भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रचना समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपला आजचा लेख गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? याविषयीचा आहे. चला तर मग गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

गावचा नकाशा पाहण्याचा उद्देश

गावचा नकाशा हा अनेक कारणांसाठी उपयोगी असतो. गावचा नकाशा पाहण्यापूर्वी त्याचा उद्देश समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गावचा नकाशा पाहण्याचा उद्देश्य आपण खाली पाहूया:

  • गावातील शेती क्षेत्र आणि त्या शेती क्षेत्राचे मालकी हक्क समजण्यासाठी
  • गावातील पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी
  • गावातील विकास आराखडे तयार करण्यासाठी
  • गावातील रस्ते, तळी, तलाव, डोंगर, नद्या यांच्या माहितीसाठी
  • गावातील ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळांचे स्थान जाणून घेण्यासाठी

गावचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

गावचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

तुमच्या गावाचा नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

  • गावचा नकाशा पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवर डाव्या बाजूस तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, व कॅटेगिरी मध्ये रुरल आणि अर्बन हे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी Village Map यावर क्लिक करायचे आहे.
  • Village Map वर क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर दिसेल.
  • होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता.
  • त्यानंतर डावीकडील + किंवा -या बटनावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा लहान आकारात ही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आउट करता येतो.
हे वाचा-  दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी canva app मधून तुमचा फोटो घालून दीपावलीच्या शुभेच्छांचे फोटो तयार करा. | Photo editor app download.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावचा नकाशा ऑनलाईन पाहू शकता.

गावचा नकाशा पाहण्याचे इतर पद्धती

महाभुलेख पोर्टल व्यतिरिक्त तुम्ही इतर पद्धतीचा देखील वापर गावचा नकाशा पाहण्यासाठी करू शकता. त्या इतर पद्धती कोणत्या  आहेत ते आपण खाली पाहूया:

  • तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा गावकामगार तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या गावचा नकाशा पाहू शकता.
  • तुम्ही तुमच्या गावचा उपग्रह नकाशा Google Maps,Bing Maps यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू शकता.
  • तुम्ही तुमच्या गावचा नकाशा तुमच्या अँड्रॉइड फोन व स्मार्टफोन ॲप्स् जसे की,mAadhaar,Dharani किंवा MapMyIndia या ॲप्स वरून तुम्ही तुमच्या गावचा नकाशा पाहू शकता.

तुमच्या जमिनीचा सातबारा नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

गाव नकाशाचे उपयोग

गावाचा नकाशा पाहून त्याचा उपयोग गावामध्ये विविध योजना, विकास आराखडे, आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा अभ्यास करता येतो. गाव नकाशाचे उपयोग काय आहे ते आपण खाली पाहू:

  • गावामध्ये गावचा नकाशा पाहून रस्ते, शाळा, पूल आणि इतर पायाभूत सुविधा गावामध्ये बांधण्याचे नियोजन करता येते.
  • गावाचा नकाशा पाहिल्यानंतर गावाची प्राकृतिक रचना लक्षात येते. त्यावरून पूर दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचा संभाव्य धोका ओळखून त्यावर उपाययोजना करता येतात.
  • नकाशाच्या माध्यमातून गावातील शेत जमिनींचे योग्य वाटप व पाणीपुरवठा व्यवस्था गावातील नागरिकांना पुरवली जाते.
  • नकाशाच्या माध्यमातून गावातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रांचे संरक्षण व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करता येतो.
हे वाचा-  प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत सरकार देत आहे आधार कार्डवर 50 हजार रुपये बिनव्याजी कर्ज. | Pm swanidhi loan scheme

सदर लेखामध्ये आपण गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? त्याचबरोबर इतर कोणत्या पद्धतीने गावचा नकाशा आपण पाहू शकतो, याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गावचा नकाशा वरील माहितीच्या आधारे पाहू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page