अवकाळी पावसाचा हवामान अंदाज
सध्याच्या वेळेमध्ये द्राक्ष, कांदा, हळद, मका, गहू, ज्वारी अशी पिके काढणीस आलेली आहेत. यामुळे सध्याचा पाऊस हा नुकसानकारक ठरू शकतो. पण शेतकऱ्यांनी जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण हा पाऊस सर्व दूर नसणार आहे. हा अवकाळी पाऊस जिल्ह्यातील दहा ते बारा ठिकाणी बरसेल इतर ठिकाणी पाऊस पडणार नाही.
29 मार्च ते 31 मार्च मध्ये अवकाळी पाऊस
महाराष्ट्र मधील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणपट्टी मध्ये हा अवकाळी पाऊस पडणार आहे.
यामधील पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भामध्ये पावसाची शक्यता थोडी जास्त प्रमाणात आहे. इतर ठिकाणी जसे की मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र व कोकण या ठिकाणी काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही कारण हा पाऊस जिल्ह्यामधील पाच ते दहा ठिकाणी पडेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये व सर्व दूर हा पाऊस असणार नाही.
पंजाब डख हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
पुढील अवकाळी पाऊस
६ एप्रिल पासून पाऊस
शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसाला जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही पण एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत आपली सर्व शेतीतील कामे उरकून घ्यावीत. कारण सहा एप्रिल नंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या पाच दिवसांमध्ये आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत.
पंजाब डख हवामान अंदाज कसा पहायचा
पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज आपण त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळवू शकता. तसेच त्यांचा दररोजचा जिल्ह्याचा तसेच तुमच्या तालुक्याचा हवामान अंदाज हवा असेल तर तुम्ही त्यांचे पंजाबराव डख हवामान अंदाज हे ॲप डाऊनलोड करू शकता.
या ॲप मध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तसेच जिल्ह्याचा व तालुक्याचा हवामान अंदाज ही पाहायला मिळतो.