पंजाबराव डख यांनी आपला नवीन अंदाज जाहीर केला आहे. बदलत्या हवामानामध्ये ते आपल्याला पावसाच्या आधी जागरूक करण्याचे काम करत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ एक जून पासून 12 जून पर्यंत महाराष्ट्रात खूप सुंदर पाऊस दिसून आला. बऱ्याच ठिकाणी पेरणीलाही सुरुवात झालेली आहे. उत्तर महाराष्ट्र मधील काही बाग वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी काही अपवाद वगळता चांगला पाऊस झाला. तसेच माझ्या पावसामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या सर्वच ठिकाणी येणारा पाऊस चांगला पडेल असे पंजाब डख सांगतात.
तुमच्या जिल्ह्याचा पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇
18 जून रोजी दिलेला हवामान अंदाज
पंजाब डक यांनी आपला नवीन हवामान अंदाज 18 जून रोजी दिलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये पंजाब डक असे सांगतात की 18 जून ते 22 जून पर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र मध्ये कोठे पाऊस पडेल तर कोठे उन्हाळा राहणार आहे.
पण 23 तारखे नंतर महाराष्ट्रात वातावरणामध्ये पूर्णपणे बदल होणार आहे. 23 तारखेला महाराष्ट्र मध्ये विदर्भ पासून पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस 25 तारखेपर्यंत मध्यम स्वरूपाचा असेल. तसेच त्यानंतर तो 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असे पंजाब डख यांनी सांगितलेले आहे.
ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये चांगली ओल झालेली आहे त्यांनी पेरणीचा निर्णय घेण्यास हरकत नाही. पुढील चार दिवसांमध्ये आपण पेरणी करून घ्यायची आहे. पण ज्या ठिकाणी पेरणीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही त्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये.
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की..
यावर्षी ज्याप्रमाणे 25 जून ते 30 जून ला पाऊस पडणार आहे. तशाच प्रकारे मागच्या इतिहासात 25 जून ते 30 जून महाराष्ट्रात पाऊस पडतो. व येणाऱ्या वर्षांमध्ये ही 25 ते 30 जून ला पाऊस हा पडतच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कॅलेंडरमध्ये या तारखांना गोल करून ठेवावे. तसेच पुढील महिन्यांमध्ये दहा जुलै ते 13 जुलै पर्यंत पाऊस हा असतो.
तुमच्या जिल्ह्याचा पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
हवामान अंदाज
तर शेतकरी मित्रांनो 18 जून ते 22 जून पर्यंत भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल. त्यानंतर 23 जून ते 25 जून या काळामध्ये भाग बदलतच पण मोठ्या सरींचा पाऊस आपल्याला दिसून येईल. तसेच त्यानंतर 26 जून पासून 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे.
शेवटी अंदाज आहे, वारे बदलला की वेळ दिशा व पावसाचे ठिकाणी बदलते.
ज्या शेतकऱ्यांना हवामान अंदाज आवडतो त्यांनी पहावा व पुढे शेअर करावा.
नाव:पंजाब डख , हवामान अभ्यासक.
तालुका: सेलू ,जिल्हा: परभणी.
दिनांक 18 जून 2024