PM Kisan Samman Nidhi: नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात (18th installment) रक्कम जमा केली आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ही हप्ता एकत्रच जमा करण्यात आलेला आहे. मात्र, काही कारणास्तव आपले नाव या लाभातून वगळले गेलेले नाही ना, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. यासाठी फक्त चार सोप्या पायर्या पूर्ण कराव्या लागतील. त्या कोणत्या ते या लेखात आपण जाणून घेऊया.
PM Kisan Yojana List : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना “PM Kisan Yojana List ” प्रती वर्ष ६००० रु दिले जातात. शेतकऱ्यांचे ज्या बँकेत आधार कार्ड (NPCI) लिंक असेल त्या खात्यात ६००० रु. समान तीन हप्त्यामध्ये DBT मार्फत पाठविले जातात.
PM Kisan Yojana List
पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये अनेक शेतकरी लाभ घेण्यास अपात्र असून सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत. हे लक्षात येताच अशा शेतकऱ्यांची भौतिक तपासणी करणे बंधनकारक केले. भौतिक तपासणी मध्ये लाभार्थी ७/१२, ८ अ, आधार कार्ड, बँक खाते पासबुक वरील सर्व माहिती चेक करूनच 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आला होता.
18 व्या हप्त्याचे २००० रु दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 ला शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविले आहेत.
लाभार्थी यादी तपासण्यासाठी डायरेक्ट लिंक.👇
लाभार्थी यादीत असे तपासा नाव
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- – यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.
- – नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.
- – नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
- – तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
- – यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
- – आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.