व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Ladaki bahin yojana: लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनीही केले अर्ज.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Ladaki bahin yojana Maharashtra

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास एक कोटी ४० लाख अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २५ लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. योजना १५ ऑगस्टपर्यंत लाभार्थींना लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत आहे. परंतु, यामुळे इतर योजना आणि नियमित कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीची तयारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे दोन कोटी महिलांना दर महिन्याला प्रत्येकी १,५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. १ ऑगस्टपासून नारीशक्ती दूत ॲपबरोबरच पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन पोर्टलवरून अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

त्रुटींचे आणि पुरुषांचे अर्ज

या योजनेसाठी आलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. काही अर्जांमध्ये पुरुषांनीच अर्ज भरले असल्याचे दिसून आले आहे. काही अर्जदारांनी रेशन कार्ड, चारचाकी वाहन याचा उल्लेखच केलेला नाही. त्यामुळे छाननी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. चुकीच्या किंवा अर्धवट माहिती असलेल्या अर्जदारांची निवड झाली तर त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. ग्रामीण भागात तालुका स्तर समिती आणि नागरी भागात वॉर्ड स्तर समिती अर्ज छाननीसाठी स्थापन करण्यात आल्या आहेत.

हे वाचा 👉  घरकुल लाभार्थ्यांना आता अतिरिक्त 50 हजार रुपयांचं अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page