कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार आता भरघोस अनुदान |कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2026| Kadba Kutti anudan yojana 2026

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2026 Kadba Kutti Machine Scheme 2026 Mahadbt Farmer Scheme 2026

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

             ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्याकरिता शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाई, म्हशी, शेळी, मेंढी, गुरे-ढोरे पालन करत असतो.  आजही मोठ्या प्रमाणात पशु पालन व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी व इतर जनावरे आहेत अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी लागते.            

kadba kutti machine yojana 2026

       

ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे असतील, त्यांना जनावरांना चारा-पाणी व्यवस्थित करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीसुद्धा एक शेतकरी असाल व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्यासाठी शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच chaff Cutter machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.

कडबा कुट्टी मशीनचे खूप फायदे (Benefits) आहेत. जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या साह्याने जलद गतीने व नासाडी न होता कापता येतो, त्याचप्रमाणे यंत्राच्या साह्याने चाऱ्याची कापणी केल्यामुळे चारा बारीक कापण्यात येतो; परिणामी जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

  कडबा कुट्टी अनुदान योजना

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे शक्य नसते. म्हणून याचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र (चाफ कटर मशीन) अनुदान योजना राज्यात  राबविली जात आहे. शेतकऱ्यांना शासनामार्फत कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी यंत्र किंमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा 20 हजार अनुदान देण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची ठरत आहे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. कडबा कुट्टी मशीन योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या लेखात आपण योजनेसाठी असणारी पात्रता, आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेच्या अटी व शर्ती याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.  

कडबा कुट्टी मशिन वापराचे फायदे (Kadba Kutti Machine Benefit):

कडबा बारीक केल्यामुळे जनावरांना खाण्यासाठी सोयीस्कर होतो. मोठा कडबा अगदी कमी वेळेत बारीक कापला जातो. कडबा बारीक केल्यामुळे कमी जागेत साठवणूक करता येते. शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कमी होते व जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. चाऱ्याची नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते.

Kadaba Kutti Machine Subsidy (कडबा कुट्टी यंत्र अनुदान) योजनेसाठी आवश्यक पात्रता:

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

  • अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर दहा एकर पेक्षा कमी शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • बँक खाते आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही वरील सर्व गोष्टीकरता पात्र असाल तर तुम्ही कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज करू शकता.  

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

  कडबा कुट्टी मशीन अनुदान साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड  
  • जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा
  • तुमच्या घराचे वीज बिल
  • जातीचा दाखला (आरक्षण असल्यास)
  • बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक)
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार आता भरघोस अनुदान |कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2026| Kadba Kutti anudan yojana 2026”

Leave a Comment

You cannot copy content of this page