व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

पावसाने नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे तक्रार कशी कराल? : Crop Insurance ॲप डाऊनलोड

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असेल, तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला विमा दावा करण्यासाठी 72 तासांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. या लेखामध्ये आपण आपल्या पिकाची नुकसान झालेले असल्यामुळे आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ऑनलाइन तक्रार कशी करायची याबाबत माहिती पाहून घेणार आहोत.

पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार हे पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

ऑनलाइन तक्रार कशी करावी?

तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणीकृत असल्यास, ऑनलाईन तक्रार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

Crop Insurance ॲप डाऊनलोड

  1. Crop Insurance ॲप डाऊनलोड करा: प्ले स्टोअरवरून Crop Insurance ॲप डाऊनलोड करा.
  2. Continue as Guest निवडा: ॲपमध्ये प्रवेश करताना “Continue as Guest” हा पर्याय निवडा.
  3. पीक नुकसान पर्याय निवडा: ॲपमध्ये पीक नुकसानाच्या तक्रारीसाठी संबंधित पर्याय निवडा.
  4. पीक नुकसानाची पूर्वसचना भरा: पीक नुकसानाच्या तपशीलांसह पूर्वसचना भरा.
  5. मोबाईल क्रमांक टाका: तुमचा मोबाईल क्रमांक नोंदवा आणि मिळालेला OTP टाका.
  6. हंगाम, योजना, राज्य निवडा: खरीप हंगाम, योजना आणि राज्य निवडा.
  7. नोंदणीचा स्त्रोत निवडा: CSC निवडा आणि पॉलिसी क्रमांक टाका.
  8. तक्रार करा: गट क्रमांक निवडा, नुकसान झालेल्या कारणांची माहिती भरा आणि पिकाचा फोटो अपलोड करा.
  9. तक्रार सबमीट करा: तक्रार सबमीट केल्यानंतर तुम्हाला docket ID मिळेल, जी विमा दावा करण्यासाठी आवश्यक आहे.
हे वाचा-  राज्यातील या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज मिळणार | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

प्रधानमंत्री पीक विमा वेबसाईटवरून तक्रार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील तुम्ही तक्रार दाखल करू शकता:

  1. https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर जा.
  2. रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिक करा.
  3. तुमच्या इंन्शुरंस कंपनीची निवड करा.
  4. सर्व आवश्यक तपशील भरा आणि तक्रार दाखल करा.
  5. तक्रारीचा क्रमांक सेव्ह करा, जो पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असेल.

पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार हे पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

कृषी विभागाकडे तक्रार कशी करावी?

तुम्ही कृषी विभागाकडे देखील तक्रार दाखल करू शकता. यासाठी सरकारने हेल्पलाईन क्रमांक 14447 उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी या क्रमांकावर कॉल करून त्यांच्या नुकसानीची तक्रार नोंदवू शकतात.

पिक विमा ऑनलाईन तक्रार

शेतकऱ्यांसाठी पीक विमा तक्रार प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. पावसामुळे नुकसान झाल्यास, वरील स्टेप्स फॉलो करून तक्रार दाखल करा आणि तुमच्या हक्कांचा विमा दावा करा. तक्रारीचा क्रमांक जपून ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण त्याद्वारे तुम्हाला पुढील मदत मिळू शकते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment