मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपयाचे अर्थसहाय्य 2024
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण एक महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजनापैकी एक योजना बघणार आहोत. त्या योजनेचे नाव आहे Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- राज्य शासन देणार. अतिशय कौतुकास्पद अशी हि योजना आहे . ह्या योजनेमुळे बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नाला एक प्रकारचे अर्थ सहाय्य होईल. आपण जर बघितले तर बांधकाम कामगार हे कामासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर हे करत असतात. कारण गावात मुबलक रोजगार हा उपलब्ध नसतो त्यामुळे आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाव व्हावा यासाठी स्थलांतर करत असतो. अश्या विविध योजना हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बांधकाम कामगारांसाठी घेवून येत असतात. त्यामध्ये भांड्याचा संच वाटप योजना , मुलांना शिष्यवृत्ती योजना अश्या अनेक महत्वपूर्ण योजना हे राज्यसरकार राबवत असते. अश्याच महत्वपूर्ण योजेनेपैकी आज आपण महत्वाची योजना बघणार आहोत. Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- रुपये असा करा अर्ज |
नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.५१,०००/- रुपये तर आपण ह्या योजनेसाठी पात्रता काय? उद्देश ? कागदपत्रे कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार योजनेमधून मोफत भांडी मिळवण्यासाठी अर्ज करा.
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र
नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरीता शैक्षणिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. तथापि मुलांच्या विवाहकरीता कोणतीही योजना राबविली जात नाही.
नोंदीत बांधकाम कामगार, लोकप्रतिनिधी व कामगार संघटनांकडून मंडळास सादर निवेदनामध्ये बांधकाम कामगाराला मिळणारे अल्प वेतनामधून दैनंदिन खर्च भागवून मुलीचे विवाह करताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब विचारात घेता नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहाकरीता 51,000/- रुपये अर्थसहाय्य मंडळातर्फे देण्यात येते.
योजनेचे उद्दिष्ट
- कामगाराला आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशांची कमतरता भासू नये.
- कामगाराला मुलीच्या विवासाठी आवश्यक पैशांसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000/- रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते.
योजनेचा कामगारांना होणारा फायदा
- कामगारांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- कामगार आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
सादर करावयाचे कागदपत्रे | ||
1 | नोंदीत बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नाकरिता अर्थसहाय्य | |
2 | नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगार असावा. | ओळखपत्र / नूतनीकरण |
3 | एका मुलीच्या विवाहखर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 51000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य देय राहील. | ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलामध्ये मुलीच्या नावाची नोंद असावी. |
4 | मुलीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त नसावे. | ओळखपत्रामध्ये जन्म तारखेची नोंद असावी. |
5 | मुलीचे शिक्षण कमीत कमी इयता 10वी पर्यंत असावे. | इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र |
6 | मुलीचा विवाह संपन्न झाल्याचा पुरावा सादर करावा. | लग्नपत्रिका / लग्नाचे फोटो / विवाह नोंदणी प्रमाणपत्र |
नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अंतर्गत अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील
- अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
- कामगार किंवा त्याची पत्नी/पती मागील 3 वर्षांपासून किमान 180 दिवस कामगार म्हणून काम करत असणे आवश्यक आहे.
- विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी उपलब्ध आहे.
- मुलीचा विवाह संपन्न झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे.
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशीलात मुलीच्या नावाची नोंद असावी.
- फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाईल.
- लग्न झालेल्या मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये. याबाबत वयाचा पुरावा (ओळखपत्रातील नोंद/ जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाईड सर्टिफिकेट) सादर करावा.
बांधकाम कामगार योजनेला अर्ज करा
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
मुलीचे कागदपत्रे
- मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशीलात मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र
- मुलीचा वयाचा दाखला
कामगाराची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- कायमचा पत्ता पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.