व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 | tractor subsidy scheme 2024 in marathi

कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या पद्धतीने तसेच जलद गतीने शेतीची कामे व्हावीत तसेच आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूने सुरू करण्यात आली आहे.या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ,ज्या योजनेचे नाव TRACTOR SUBSIDY SCHEME 2024 आहे.

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 8 HP ते 70 HP ट्रॅक्टर च्या खरेदीसाठी 50% म्हणजेच जवळ जवळ 1.25 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.

आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांना पैशाच्या अभावामुळे शेती कामासाठी लागणारे आधुनिक यंत्र सामग्री घेण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते आधीच्या चालीरीतीप्रमाणे शेती पद्धती करत असतात आधीच्या पद्धतीने शेती करायला खूप वेळ लागतो व खूप मेहनत करावे लागते.यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. यावर पर्याय म्हणून व शेती कार्यात मदत व्हावी यासाठी सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे.

मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी  म्हणजेच 1 लाख रुपये अनुदान मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर करता येतील.

योजनेचे हेतू

  • योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणारे ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी 50 टक्के म्हणजेच जवळजवळ एक लाख रुपये चे अनुदान मिळावे .
  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी आणि त्यासाठी अनुदान मिळवून देणे.
  • राज्यातील नागरिकांना शेतीच्या क्षेत्रात घेऊन जाणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी एक नवीन चालना देणे.
  • शेतीची कामे कमी कालावधीत होण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
हे वाचा-  टी-20 वर्ल्ड कप साठी भारताचा संघ जाहीर | Indian t-20 squad for worldcup 2024.

योजनेचे वैशिष्ट्य

  • या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व गटामधून येणारे शेतकरी अर्ज करू शकतात .
  • योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये DBT च्या सहाय्याने देण्यात येईल.
  • यामध्ये केंद्र शासनाचा 60% आणि राज्य शासनाचा 40% सहभाग आहे.

योजनेसाठी पात्र

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व प्रवर्गातील महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पात्र आहेत.

योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान:

  • या योजनेमध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान मिळणार आहे म्हणजेच जवळजवळ 1.25 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान मिळणार आहे .
  • 8 एचपी ते 20 एचपीच्या ट्रॅक्टर साठी 40% म्हणजेच जवळजवळ 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • 20 एचपी ते 40 एचपी च्या ट्रॅक्टर साठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • आणि जर ट्रॅक्टर 40 एचपी ते 70 एचपी पर्यंत असेल तर अनुदान 1.25 लाख हजार रुपये इतके मिळेल.

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना नेमका काय फायदा होणार?

  • शेतकरी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी कालावधीत सोप्या पद्धतीने तसेच जलद गतीने कार्य करू शकतात.
  • तसेच शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी प्रोत्साहित होतील आणि शेतीसाठी एक नवीन चालना मिळेल.

आवश्यक पात्रता

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नागरिक असणे आवश्यक आहे.

नियम व अटी

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • फक्त शेतकरी वर्गालाच या योजनेचा लाभ मिळेल.
  • या योजनेमध्ये शेतीसाठी स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे आणि तो स्वतः शेतकरी असणे गरजेचे आहे.
  • या योजनेमध्ये 50% इतके अनुदान असले तरीसुद्धा 1.25 लाखापेक्षा जास्त अनुदान दिला जाणार नाही.
  • जर शेतकऱ्यांनी या अगोदर कोणतेही केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून असणाऱ्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबामध्ये फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल .
  • अर्जदारांनी एखाद्या घटकासाठी अर्ज केल्यास परत त्या अर्जदाराला पुढील दहा वर्ष त्याच घटकासाठी अर्ज करता येणार नाही. परंतु तो दुसऱ्या इतर घटकांसाठी पात्र ठरू शकतो.
हे वाचा-  मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 |मिनी ट्रॅक्टर साठी सरकारकडून 90 टक्के अनुदान.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड- मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • सातबारा(7/12) उतारा
  • 8 अ प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर बँक पासबुकला लिंक करणे गरजेचे आहे
  • चालू असलेला ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईजचे फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • प्रतिज्ञापत्र

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • आपल्या क्षेत्रातील कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात अर्जदार शेतकऱ्याला जावे लागेल.
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून त्याला लागत असलेले प्रति जोडून सर्व कागदपत्रे सदर कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा पद्धतीने ट्रॅक्टर योजनेअंतर्गत तुमची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

पहिला टप्पा

  • प्रथम अर्जदाराला शासनाच्या संबंधित योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेज दिसेल तिथे नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावे लागेल.
  • आता तिथे जे काही पेज उघडेल तिथे आपली विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • सर्व माहिती योग्य रीतीने भरली आहे का हेच चेक करून रजिस्टर वर क्लिक करावे लागेल.
  • अशा पद्धतीने तुमची नवीन अर्जदार नोंदणी होईल.

दुसरा टप्पा

अर्जदार शेतकऱ्याला आपला username आणि password टाकून लॉगिन करावे लागेल.

तिसरा टप्पा

  • अर्जदाराला कृषी विभागाच्या होमपेजवर जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजना यावर क्लिक करावे.
  • आता तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये योग्य ती माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून रजिस्टर बटनावर क्लिक करावे.
  • अशा प्रकारे तुमची ट्रॅक्टर अनुदान अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
हे वाचा-  महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत |berojgari bhatta yojana apply

या योजनेची अधिकृत वेबसाईट

ट्रॅक्टर सबसिडी योजना अधिकृत वेबसाईट /हेल्पलाइन नंबर

1800-120-8040/022-49150800

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment