व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा 8 व्या हप्ताचा लाभ अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना घेता येणार नाही, अपात्र यादीमध्ये तपासा तुमचे नाव.!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8 व्या हप्त्यासाठी जर तुम्ही अपात्र ठरला असाल तर, तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारी 1500 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार नाही. जर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरला असाल तर, तुम्ही तुमचे नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अपात्र यादी मधून तपासू शकता. ते कसे तपासायचे? याबाबतची संपूर्ण माहिती या पोस्टच्या माध्यमातून आपण पाहूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे राबविण्यात येणारी एक खूपच महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये प्रतिमाह 1500 रुपयांची रक्कम जमा केली जाते. सदरची योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांना स्वावलंबी बनवणे त्याचबरोबर त्यांचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकांमध्ये खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे ही योजना माहिती सरकारसाठी किंगमेकर ठरली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत या वयोगटातील महिलांची आकडेवारी टक्केवारीमध्ये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 83% महिला विवाहित लाभार्थी महिला आहेत यामध्ये..

  • 30 ते 39 वर्ष वयोगटामध्ये 30% महिला आहेत.
  • 21 ते 29 वर्ष वयोगटामध्ये 23% महिला आहेत.
  • 40 ते 50 वर्ष वयोगटामध्ये 25% महिला आहेत.
  • 60 ते 65 वर्ष वयोगटांमध्ये फक्त 5% महिला आहेत.
हे वाचा 👉  PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 4000 रुपये, अपात्र शेतकऱ्यांची यादी पहा.

वरील टक्केवारीचा विचार करता या योजनेचा लाभ 30 ते 39 वर्ष वयोगटातील सर्वात जास्त म्हणजेच 30% महिला म्हणजेच घेत आहेत. आणि सर्वात कमी लाभ हा 60 ते 65 वर्ष वयोगटातील फक्त 5% महिला घेत आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8 व्या हप्त्यासाठी या महिला असणार आहेत अपात्र 

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाही राज्यातील गरीब महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी काही अटी व शर्तींचे मापदंड घालून ही योजना सुरू केली आहे. परंतु या अटी व शर्ती डावलून राज्यातील बहुतांश महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे अर्ज पडताळणी मध्ये दिसून आले आहे. अजूनही या योजनेच्या अर्ज पडताळणीचे आदेश प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांना दिलेली आहेत. खर्च पडताळणी प्रक्रिया ही मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज पडताळणी मध्ये अपात्र महिलांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिलांचे अर्ज पडताळणी करून बाद करण्यात आले होते. जानेवारी महिन्यातील 7 वा हप्ता हा 2 कोटी 41 लाख महिलांनाच देण्यात आला होता. यामध्ये अजून 2 लाख 30 हजार महिलांना अपात्र घोषित केलेले आहे. या महिलांना अपात्र करण्याचे कारण म्हणजे यातील काही महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या तर काही महिलांचे वय ही 65 वर्षापेक्षा जास्त होते.

हे वाचा 👉  कलियुगात हनुमानजी कुठे राहतात आणि कोणत्या लोकांनी त्यांना पाहिले आहे, जाणून घ्या कलियुगात बजरंगबली कसे दिसणार.

आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेचा 8 वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्याचे वितरण करण्यापूर्वी किमान 10 लाख महिला अपात्र होऊन त्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये विक्रीत करण्यात येणारा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी नवीन निकष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्ती डावलून राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे असे दिसून आले आहेत. त्यामुळे आता सरकारकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. या नवीन नियमावलीनुसार सदर योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ज्या बँकेमध्ये सदर महिलांचे बँक खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन ई-केवायसी करून हयातीचा दाखला काढावा लागणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील 16 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आले होते परंतु जेव्हा फेर तपासणी करण्यात आली त्यावेळी या महिलांच्या आधार कार्डवरील नाव, बँक खात्यावरील नाव व या योजनेच्या अर्जावरील नाव हे वेगवेगळी असल्याचे दिसून आल्यामुळे यांनाही या योजनेतून अपात्र करण्यात येऊ शकते. त्यामुळे सरकारने सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार पात्र महिलांना ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे अन्यथा सदर महिलांना या योजनेचा पुढील लाभ घेता येणार नाही.

या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्यातील 8 व्या हप्त्याचा लाभ अर्ज पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना घेता येणार नाही. याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरला असाल तर तुमचे नाव अपात्र यादीमध्ये तपासू शकता. धन्यवाद!

हे वाचा 👉  विद्यार्थ्यांना आता मिळणार उत्पन्नाशिवाय वैयक्तिक कर्ज, कसे ते? पहा संपूर्ण माहिती..|Student Personal Loan Without Income

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page