व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

पीएम विश्वकर्मा योजना | खराब सिबिल स्कोर असेल तरीही मिळणार या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज.. पहा संपूर्ण माहिती!

नमस्कार, आज आपण या लेखामध्ये खराब सिबिल स्कोर वर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा लाभ कसा घ्यायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Low cibil score loan: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 2023 रोजी केली होती.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकार मार्फत संपूर्ण देशामध्ये राबवली जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत देशातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हस्तकला आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून किंवा वाढवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे ज्या लोकांचे ध्येय आहे, पण ज्यांचा सिबिल स्कोर खराब आहे अशा लोकांना सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपये कसे मिळवायचे याच्या माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना फायदे,उद्दिष्टे आणि महत्त्व

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे कारागीर आणि लहान व्यवसायिकांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे हे आहे. या योजनेअंतर्गत सरकार विविध प्रकारची खर्चे प्रदान करत असते, जेणेकरून लोक त्यांचा व्यवसाय व्यवस्थित रित्या स्थापित करून आर्थिक आणि सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या विकसित होऊ शकतील.

हे वाचा-  सर्व क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळवून देणारी पीएम श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्त्व हे आहे की, ज्यांना बँकांकडून खराब सिबिल स्कोर वर कर्ज मिळू शकत नाही अशा लोकांना या योजनेमार्फत कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना केवळ आर्थिक मदतीबरोबरच लोकांना स्वावलंबी बनवण्याची संधी देखील देते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कर्जाची रक्कम, कालावधी व व्याजदर

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 5 ते 7 वर्षाच्या कालावधीसाठी 6% ते 12% वार्षिक व्याजदराने कारागीर व छोटे व्यापारी यांना दिली जाते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कर्ज मिळवण्यासाठीची संबंधित क्षेत्रे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती ही खाली दिलेल्या संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे.

  • सुतार
  • बोट किंवा नाव बनवणारे
  • लोहार
  • टाळे बनवणारे कारागीर
  • सोनार
  • कुंभार
  • शिल्पकार
  • मेस्त्री
  • मच्छीमार
  • टूल किट निर्माता
  • दगड फोडणारे मजूर
  • मोची कारागीर
  • टोपली, चटई, झाडू बनवणारे
  • बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
  • न्हावी
  • हार बनवणारे
  • धोबी
  • शिंपी

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पात्रता

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक असते. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे:

  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये देशातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आला आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त व पन्नास वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ हा फक्त कारागीर किंवा लहान व्यावसायिकांना घेता येतो.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावी.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कर भरत नसेल तर अर्जदार सदर योजनेसाठी पात्र असेल.
हे वाचा-  लाडकी बहीण योजनेच्या अपार यशानंतर, राज्य सरकार लाडकी गृहिणी योजना आणणार.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपये कसे मिळवायचे याच्या माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने करता येते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे पाहूया, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

  • सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://pmvishwakarma.gov.in/
  • संकेतस्थळ ओपन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला नवीन नोंदणी (New Registration) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर रजिस्टर करून कॅप्च्या कोड भरा.
  • त्यानंतर OTP ऑप्शन वर क्लिक करा.
  • तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून Verify करा.
  • नंतर तुमचा आधार नंबर टाकून फिंगर प्रिंट ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
  • ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भरा.
  • त्यानंतर योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यानंतर सर्वात शेवटी सबमिट पर्यावर क्लिक करून रिसीट (पावती) मिळवा.
हे वाचा-  शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी: 18 वा आणि 19 वा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार याची माहिती पहा.

अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो.

सदर लेखामध्ये आपण खराब सिबिल स्कोर वर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज स्वरूपात मिळणारी रक्कम कशी मिळवायची याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणारी कर्ज स्वरूपातील मदत घेऊन तुमच्या व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायामध्ये वाढ करून आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page