व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Call Recording App चा वापर करून एखादा महत्त्वाचा Call Record कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती.!

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये Call Recording App वरून एखादा महत्त्वाचा Call Record कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

आजच्या या धावपळीच्या युगात, कॉल रेकॉर्डिंग अनेक महत्त्वाच्या कारणांसाठी उपयुक्त आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या धावपळीच्या युगात महत्त्वाच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे शक्य नाही. या कारणांमुळेच कॉल रेकॉर्डिंगमध्ये व्यवसायिक संभाषण, खूपच महत्त्वाचे संवाद, भविष्यात संदर्भासाठी कॉल रेकॉर्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. वर दिलेल्या महत्त्वाच्या कारणांसाठी कॉल रेकॉर्ड करणे अनेकांना महत्त्वाचे वाटते. कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये विविध कॉल रेकॉर्डिंग ॲप्स् उपलब्ध आहेत. या कॉल रेकॉर्डिंग ॲप्स् बरोबरच कॉल रेकॉर्डिंगचे महत्व, कॉल रेकॉर्डिंग कसा करायचा? कॉल रेकॉर्डिंग करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहूया.

कॉल रेकॉर्डिंगचे फायदे/महत्व

कॉल रेकॉर्डिंग चे महत्व खूपच आहे अनेक प्रकारे महत्त्वाच्या गोष्टींमध्ये खूपच उपयुक्त ठरू शकते. कॉल रेकॉर्डिंगचे फायदे/महत्व आपण खाली पाहूया:

  • जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या मीटिंग, मुलाखती व महत्त्वाच्या चर्चांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग खूप महत्त्वाचे आहे.
  • सुरक्षेच्या दृष्टीने पाहायचे झाले तर कॉल रेकॉर्डिंग हे एक खूपच महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करते.
  • शिक्षणामध्ये सुद्धा कॉल रेकॉर्डिंग खूप महत्त्वाचे आहे. एखादा कॉल रेकॉर्ड तुम्हाला एखाद्या विषयावर वारंवार मार्गदर्शन घेण्यासाठी मदत करू शकतो.
हे वाचा 👉  मुलांसाठी पॅन कार्ड ची आवश्यकता आहे काय? | मुलांच्या पॅन कार्ड साठी अर्ज कसा करावा.

कॉल रेकॉर्डिंगसाठी काही महत्त्वाचे ॲप

कॉल रेकॉर्डिंगसाठी विविध ॲप उपलब्ध आहेत. ह्या ॲपची वैशिष्ट्ये पाहून तुम्ही कॉल रेकॉर्डिंगसाठी कोणत्याही ॲपची निवड करू शकता. कॉल रेकॉर्डिंग साठी महत्त्वाचे ॲप आपण खाली पाहूया:

  • Automatic Call Recorder
  • Cube Call Recorder
  • Call Recorder -ACR
  • Truecaller Call Recorder

Call Recording App वरून call Recording कसे करायचे?

Call Recording App वरून Call Recording करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • Call Recording करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Android मोबाईल किंवा iPhone डिव्हाइसच्या Google Play Store किंवा Apple App Store मध्ये जाऊन तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग साठी चांगले वैशिष्ट्य असणारे ॲप निवडून डाऊनलोड करा.
  • कॉल रेकॉर्डिंग ॲप डाऊनलोड केल्यानंतर ॲप इंस्टॉल आणि सेटअप करून ते ओपन करा.
  • ॲप ओपन केल्यानंतर आपला आवश्यक असलेली परवानगी द्या, जसे की संपर्क, कॉल लॉग आणि स्टोरेज ॲक्सेस इ.
  • काही कॉल रेकॉर्डिंग ॲप्स मध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग चालू करण्याचा पर्याय असतो तो निवडा.
  • त्यानंतर ॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला कोणते कॉल रेकॉर्ड करायचे आहेत हे निवडा. यामध्ये Inbound, Outbound किंवा दोन्ही
  • काही ॲप्समध्ये विशिष्ट कॉन्टॅक्ट साठी रेकॉर्डिंग सेट करण्याचा पर्याय असतो तो तुम्ही निवडू शकता.
  • कॉल रेकॉर्डिंगचा फॉरमॅट (MP3,WAV,AAC इ.) निवडा.
  • यानंतर सर्वात शेवटी तुम्ही कॉल केल्यानंतर किंवा कॉल घेतल्यानंतर कॉल रेकॉर्डिंग ॲप ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग सुरू करेल.
  • काही ॲप्समध्ये मॅन्युअली रेकॉर्डिंग सुरू करण्याचा पर्याय सुद्धा असतो. अशावेळी तुम्ही कॉल सुरु झाल्यानंतर रेकॉर्ड बटन दाबू शकता.
  • यानंतर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ॲप मध्ये जाऊन Recorded Calls विभाग उघडा.
  • या विभागामध्ये रेकॉर्ड झालेले रेकॉर्डिंग तुम्ही ऐकू शकता, डिलीट करू शकता किंवा गरज असल्यास शेअर सुद्धा करू शकता.
हे वाचा 👉  लाडक्या बहिणींना आता मिळणार मोफत सूर्यचुल, अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती!

अशा पद्धतीने तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ॲप्स वरून कॉल रेकॉर्ड सहजपणे करू शकता.

Call Recording करताना घ्यावयाची काळजी

Call Recording करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण खाली पाहूया:

  • कॉल रेकॉर्डिंग करणे हे काही देशांमध्ये किंबहुना भारतातील काही राज्यांमध्ये बेकायदेशीर असू शकते. त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करण्यापूर्वी तुम्हाला कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही ज्या व्यक्तीचा कॉल रेकॉर्ड करणार आहात याची माहिती समोरच्या व्यक्तीला देणे आवश्यक आहे.
  • काही कॉल रेकॉर्डिंग ॲप्स तुमचे कॉल डेटा ऑनलाइन स्टोअर करू शकतात. यामुळे कॉल रेकॉर्डिंग ॲपची निवड करताना त्यांच्या गोपनीयता धोरणांची माहिती घ्या.

सदर लेखामध्ये आपण Call Recording App वरून Call Recording कसे करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा गरज असल्यास कॉल रेकॉर्डिंग ॲपचा वापर करून कॉल रेकॉर्डिंग करू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page