व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी,असे बनवा जेष्ठ नागरिक कार्ड/सीनियर सिटीजन कार्ड.. पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार, देशामध्ये 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयांच्या व्यक्तींना जेष्ठ नागरिक म्हटले जाते. या ज्येष्ठ नागरिकांच्या साठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांच्या कडे सरकारद्वारे देण्यात येणारे ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा सीनियर सिटीजन कार्ड असणे आवश्यक आहे. हे ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा सीनियर सिटीजन कार्ड काय आहे? याबाबतची संपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहूया.

ज्येष्ठ नागरिक कार्ड/सीनियर सिटीजन कार्ड विषयी थोडक्यात..

भारत सरकारद्वारे देशातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयांच्या नागरिकांना देण्यात येणारा अधिकृत दस्तावेज म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड होय. ज्येष्ठ नागरिक कार्ड हे ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीचा पुरावा म्हणून एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. ज्येष्ठ नागरिक कार्ड द्वारे केंद्र व राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या साठी राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या सुविधा आणि फायदे घेता येतात.

पॅन कार्ड दाखवल्यावर मिळतील एक लाख रुपये. खालील बटन वर क्लिक करा.

ज्येष्ठ नागरिक कार्ड/सीनियर सिटीजन कार्ड फायदे

ज्येष्ठ नागरिक कार्ड धारकांना केंद्र व राज्य सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांचे फायदे व सुविधा मिळतात. ते फायदे व सुविधा काय आहेत? ते खालीलप्रमाणे:

आर्थिक सुविधा व फायदे

  • ज्येष्ठ नागरिक कार्ड धारकांना पेन्शन योजनांमध्ये विशेष लाभ मिळतो.
  • बँकांमधील ठेवीवर जास्त व्याजदर मिळतो.
  • आयकरामध्ये सवलत आणि कपात याचा लाभ घेता येतो.
  • पोस्ट ऑफिस मधील योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशावर जास्त व्याजदर मिळतो.
हे वाचा 👉  सरकारकडून शेत रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार , प्रत्येक शेतरस्ता होणार 12 फुटांच्या पुढे

आरोग्य सुविधा

  • सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत किंवा अनुदानित उपचाराची सुविधा मिळते.
  • आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर सवलत मिळते.
  • औषधांवर सवलत किंवा सूट मिळते.
  • काही खाजगी रुग्णालयामध्ये उपचारावर सूट मिळते.

प्रवास सुविधा

  • रेल्वे प्रवासामध्ये 40-50% पर्यंत सूट मिळते.
  • विमान प्रवासामध्ये (काही एअरलाईन्सवर) 50% पर्यंत सूट मिळते.
  • बस प्रवासामध्ये (राज्य परिवहन बसमध्ये) 50% पर्यंत सूट मिळते.
  • रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर स्वतंत्र सुविधा

वरील सुविधा बरोबरच राज्य व केंद्र सरकारद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनेचा लाभ घेता येतो.

ज्येष्ठ नागरिक कार्ड/सीनियर सिटीजन कार्ड पात्रता

ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराला पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. हे पात्रता निकष काय आहेत? ते खालीलप्रमाणे:

  • ज्येष्ठ नागरिक कार्डासाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे व्यक्तीचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार ज्या राज्यातून ज्येष्ठ नागरिक कारणासाठी अर्ज करत आहे, त्या राज्याचा तो कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • ज्येष्ठ नागरिक कारणासाठी अर्ज करताना अर्जदाराकडे वैध ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

तुमच्या आधार कार्ड ला कोणता नंबर लिंक आहे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

ज्येष्ठ नागरिक कार्ड/सीनियर सिटीजन कार्ड आवश्यक कागदपत्रे

ज्येष्ठ नागरिक कार्ड साठी अर्ज करताना अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत? ते खालीलप्रमाणे:

  • वयाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इ.
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इ.
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल इ.
  • पासपोर्ट साईज फोटो
हे वाचा 👉  बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी आणखी एक मार्ग खुला – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 10 अतिरिक्त गुण मिळवण्याची उत्तम संधी!

ज्येष्ठ नागरिक कार्ड/सीनियर सिटीजन कार्ड अर्ज कसा करायचा?

ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://services.india.gov.in/service/detail/apply-for-senior-citizen-certificate-1
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज ओपन होईल त्या पेजवर जेष्ठ नागरिक कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • ज्येष्ठ नागरिक कार्ड या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल.
  • अर्ज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरा. सदर माहिती मध्ये अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, रक्तगट, कायमचा पत्ता, राज्य, पिनकोड, तहसील, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, नातेवाईकांचे नाव, फोन नंबर इ. माहिती
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सदर कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी अर्ज करता येतो.

सदर सुविधांचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक कार्ड नेहमी सोबत ठेवणे आवश्यक आहे. मग तो लाभ आरोग्य सुविधांचा असो किंवा प्रवास सुविधांचा असो किंवा आर्थिक सुविधांचा असो.

सदर लेखामध्ये आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा सीनियर सिटीजन कार्ड विषयाची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा तुम्ही स्वतः सीनियर सिटीजन कार्ड किंवा जेष्ठ नागरिक कार्ड ऑनलाईन प्रक्रियेद्वारे बनवून घेऊ शकता. धन्यवाद!

हे वाचा 👉  Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check Maharashtra Online | माझी लाडकी बहीण योजना DBT स्टेट्स कस चेक करायचं?

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page