व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

शेतकऱ्यांना सरकारी योजना व सुविधांचा तत्काळ लाभ घेण्यासाठी, असे बनवा शेतकरी डिजिटल ओळखपत्र..| apply online for farmer id card

नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारकडून देशातील शेतकरी शेती व्यवसाय मधून स्वावलंबी व्हावेत यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे देण्यासाठी डिजिटल कृषी मिशन अंतर्गत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र हे टप्प्याटप्प्याने वित्तीय वर्षांमध्ये देण्यात येणार आहेत. म्हणूनच केंद्र सरकारने शेतकरी ओळखपत्र योजना सुरू केली आहे.  सदर लेखांद्वारे शेतकरी ओळखपत्र योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

शेतकरी ओळखपत्र योजनेअंतर्गत महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, आसाम आणि ओडिषा या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र बनवले जात आहेत. शेतकरी ओळखपत्र हे ॲग्री स्टॅक प्लॅटफॉर्मचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शेतकऱ्यांची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत करतो. शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा कुटुंब ओळखपत्र आणि त्यांच्या जमीनीशी संबंधित माहिती द्यावी लागते. शेतकरी ओळख पत्राच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकऱ्यांना भविष्यातील विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे.

आधार कार्ड कसे डाउनलोड करावे व डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

शेतकरी ओळखपत्राविषयी थोडक्यात..

शेतकरी ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडलेले आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार केलेली एक डिजिटल ओळख आहे. शेतकरी ओळखपत्र हे देशातील राज्यांच्या भूमी अभिलेख विभागाशी थेट जोडलेले आहे. याचा अर्थ जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित कोणतेही माहिती कोणत्याही कारणास्तव बदलत असते, तेव्हा शेतकरी ओळखपत्र देखील आपोआप अपडेट होते. शेतकरी ओळखपत्र ही एक अशी प्रणाली आहे जी शेतकऱ्यांची जमिनी विषयक संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात ठेवून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करते.

शेतकरी ओळखपत्राचा उद्देश

  • डिजिटल कृषी मिशन अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या शेतकरी ओळखपत्राचा मुख्य उद्देश्य म्हणजे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व सरकारी योजना आणि सेवा सहज उपलब्ध करून देणे हा आहे.
  • शेतकरी ओळखपत्र या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कृषी कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे म्हणजेच शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राची पूर्तता न करता, बँकेला भेट न देता अगदी कमी वेळेत कृषी कर्ज मिळू शकते.
  • शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची कृषी उपकरणे, खते आणि बियाण्यांची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यात येते. याबरोबरच शेतकऱ्यांना त्यांची पिके आणि माती परीक्षण करण्यासाठी स्थानिक पातळीवर सल्ला दिला जातो.
  • शेतकरी ओळखपत्र द्वारे सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पाठवून या ओळखपत्राची पारदर्शकता सुनिश्चित करते.
  • शेतकरी ओळखपत्र या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाची संपूर्ण माहिती मिळवणे शक्य झाले आहे, त्यानुसार शेतकरी शेतामध्ये पिकाचे उत्पादन घेऊन चांगला भाव मिळवू शकतो.
हे वाचा-  टाटा योद्धा खरेदी करा. | buy Tata yoddha. Tata yoddha features,price and specifications.

शेतकरी ओळखपत्राचे फायदे

देशामध्ये, कृषी क्षेत्र डीजीटलायझेशनच्या दिशेने पाऊल टाकत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया जलद सुरू आहे. या डिजिटल ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजनांचा आणि सेवांचा लाभ घेता येणार आहे. शेतकरी ओळखपत्राचे फायदे कोणकोणते आहेत? ते खालीलप्रमाणे:

  • शेतकरी ओळखपत्रामुळे शेतकऱ्याला सरकारी योजना किंवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी ओळखीचा पुरावा वारंवार देण्याची गरज भासणार नाही.
  • शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्याची ओळख पडताळण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
  • शेतकरी ओळखपत्राद्वारे शेतकरी सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतील.
  • शेतकऱ्यांना एक डिजिटल आयडी मिळेल जो त्यांच्या ओळखीचा पुरावा असेल.
  • शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकांकडून सहज खर्च मिळू शकेल, त्याचबरोबर खते, बी- बियाणे, कृषी उपकरणे इ. वर सबसिडी मिळेल.
  • शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सरकारला शेतकऱ्यांसाठी अधिक चांगल्या योजना बनवता येतील.

शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी शेतकऱ्याला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते, सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया.

  • आधार कार्ड
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
  • कुटुंब ओळखपत्र किंवा रेशन कार्ड
  • जमिनीचा ७/१२ उतारा

आधार कार्ड कसे डाउनलोड करावे व डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे?

शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्याला ऑनलाईन नोंदणी किंवा अर्ज करून बनवावे लागते. शेतकरी ओळखपत्र बनवण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया.

  • सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇🏼👇🏼 https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/
  • वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम उजव्या बाजूला असलेल्या शेतकरी पर्यायावर क्लिक करा, त्याचबरोबर तुम्ही या वेबसाईटला पहिल्यांदा भेट देत असाल तर नवीन खाते तयार करा.
  • नवीन खाते तयार करण्यासाठी आधार कार्डद्वारे e-KYC करा. या दरम्यान सत्यापनासाठी आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  • केवायसी पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर लोकसंख्या तपशील दिसेल, सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा.
  • तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर AgriStack Platform शी लिंक करण्यास सांगितले जाईल. आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर भरा आणि ओटीपी द्वारे सत्यापित करा. या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घ्यायचे आहे की, एका खात्याशी फक्त एकच मोबाईल नंबर लिंक केला जाऊ शकतो.
  • पासवर्ड तयार करण्यासाठी वर्णमाला, अंक आणि विशेष वर्ण वापरा.
  • मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा ओटीपी पर्याय निवडून कॅप्च्या कोड भरा आणि लॉगिन करा.
  • लॉग इन केल्यानंतर शेतकरी म्हणून नोंदणी करा या बटणावर क्लिक करा.
  • ईमेल आयडी प्रविष्ट करा आणि सत्यापित करा. ई-मेल आयडी प्रविष्ट करणे हे ऐच्छिक असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, आणि पत्ता (इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये भरायचे आहे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती मध्ये बदल करायचे असतील तर Insert Latest Residential Details वर क्लिक करून अपडेट करा.
  • त्यानंतर तुम्हाला जमिनीच्या मालकीच्या तपशिलामध्ये मालक निवडा, व्यवसायाच्या तपशील मध्ये शेती आणि जमीन मालक शेती बॉक्स मध्ये भरा. जमिनीच्या तपशिलामध्ये मध्ये Fetch Land Detail वर क्लिक करा. जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव निवडा. सर्वे नंबर मध्ये सातबारा क्रमांक भरा आणि सबमिट करा. स्क्रीनवरील मालक आणि ओळख कर्त्याच्या सूचीमध्ये तुमचे नाव निवडा. सर्व जमीन सत्यापित करा या बटणावर क्लिक करा.
  • सोशल रजिस्ट्री तपशिलामध्ये रेशन कार्ड किंवा फॅमिली आयडी भरा.
  • विभागाच्या मान्यतेसाठी महसूल निवडा चेक बॉक्समध्ये सहमती दर्शवा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर e-Sing प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला.e-Sing पुढे जा या बटणावर क्लिक करून आधार क्रमांक टाका आणि ओटीपी मागवा. ओटीपी भरा आणि सबमिट करा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्हाला शेतकरी नाव नोंदणी क्रमांक दिला जाईल.
  • नाव नोंदणी क्रमांकाच्या मदतीने तुम्ही शेतकरी ओळख पत्राच्या निर्मितीची स्थिती तपासू शकता.
हे वाचा-  CSC सेवा व्यवसाय कसा सुरू करावा | How Start CSC Service Business

अशा पद्धतीने तुम्हाला शेतकरी ओळखपत्र साठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

सदर लेखामध्ये आपण केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी बनवण्यात येणारे शेतकरी ओळखपत्र याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे शेतकरी ओळखपत्र तयार करून घेऊ शकता आणि सरकारच्या सर्व योजना आणि सुविधांचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page