व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

फोटोचा तयार करा व्हिडिओ, फोटोचा वापर करून व्हिडिओ कसा बनवायचा? ते पहा.|AI Photo to Video Maker Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स च्या माध्यमातून फोटोचा वापर करून व्हिडिओ कसा बनवायचा? हे पाहणार आहोत.

AI (Artificial Intelligence) वापर करून फोटोचा व्हिडिओ तयार करणे, ही एक अत्यंत रोचक आणि प्रभावी प्रक्रिया आहे. तुम्ही हे तंत्रज्ञान वापरून अनेक प्रकारच्या फोटो मधून आकर्षक व्हिडिओज तयार करू शकता. हे सर्व AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळे फोटो पासून व्हिडिओ तयार करणे खूपच सोपे झाले आहे. पण यासाठी काही साधने आणि प्लॅटफॉर्म ची आवश्यकता आहे. ती साधने आणि प्लॅटफॉर्म काय आहेत? हे आपण खाली पाहणारच आहोत. तत्पूर्वी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? हे पाहूया.

AI (Artificial Intelligence) म्हणजे काय?

कृत्रिम वस्तूने दर्शवलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधारणपणे संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानामध्ये जास्त आढळत असला तरी, ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. यामध्ये यंत्र शिक्षण, त्याचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्राशी निगडित आहे. उदाहरण दाखल पाहायचे झाले तर, नियोजन, संयोजन, निदान-विषय प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज आणि चेहरा ओळखण्याची क्षमता इ. या सर्व प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणारी विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे.

हे वाचा 👉  आधार कार्डद्वारे पर्सनल आणि बिझनेस लोन कसे घ्यावे? PMEGP लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता जगातील सर्व क्षेत्रांमध्ये होताना दिसून येत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा असणार आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चला तर मग आपण पाहूया AI तंत्रज्ञानाच्या आधारे फोटोचा वापर करून व्हिडिओ कसा तयार करायचा:

AI टूल्स किंवा सॉफ्टवेअरची निवड करा

AI तंत्रज्ञानाच्या आधारावर फोटोचा वापर करून व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक AI आधारित टूल्स बाजारामध्ये आहेत.हे AI टूल्स कोणते आहेत ते पाहूया:

  • Canva Pro: हे फोटो स्लाईड शो तयार करण्यासाठी खूपच उत्तम आहे.
  • Runway ML: AI आधारित क्रिएटिव्ह व्हिडिओ संपादन करण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • Animoto: फोटो आणि म्युझिक सह प्रोफेशनल व्हिडिओ तयार करण्यासाठी हे खूपच उपयुक्त आहे.
  • Adobe Premiere Pro आणि After Effects(AI-इनेबल्ड फीचर्ससह): याचा वापर ऍडव्हान्स व्हिडिओ तयार करण्यासाठी होतो.

फोटोची निवड करणे

AI टूल्स चांगले रिझल्ट देण्यासाठी उच्च रिझर्वेशन असलेल्या फोटोवर उत्तम काम करतात. त्यामुळे फोटो वरून व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला फोटोची थीम निवडणे आवश्यक आहे जसे की, कौटुंबिक आठवणी, लग्न, प्रवास, त्याचबरोबर अनेक इतर प्रसंग इ. जर तुम्ही निवडलेल्या फोटोमध्ये सुधारणा करायची असेल तर तुम्ही फोटो एडिटिंग टूल्स वापरू शकता. एडिटिंग टूल्स म्हणून तुम्ही Snapseed किंवा Photoshop वापरू शकता.

AI टूल्समध्ये फोटो अपलोड करा

तुम्ही ज्या AI टूल्सची निवड केली आहे त्यामध्ये लॉगिन करा. फोटो अपलोड करण्यासाठी एक ड्रॅग ॲड ड्रॉप फीचर असते ते वापरा. अपलोड केलेल्या फोटोंचा क्रम लावा, म्हणजे तुम्ही बनवणाऱ्या व्हिडिओचा प्रवाह स्पष्ट होईल.

हे वाचा 👉  TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

व्हिडिओ थीमची आणि टेम्पलेटची निवड करा

AI टूल्स वेगवेगळ्या थीम्स आणि टेम्प्लेट्चे पर्याय देते. म्हणजे तुम्ही ज्या विषयाचा व्हिडिओ बनवणार असाल त्या विषयानुसार थीम्स आणि टेम्पलेट ची निवड करू शकता. उदा. लग्नासाठी रोमँटिक थीम, प्रवासासाठी साहसी आणि चित्तथरारक थीम, कार्पोरेट सादरीकरणासाठी प्रोफेशनल थीम, कौटुंबिक आठवणींसाठी इमोशनल थीम इ.

संगीत आणि आवाज जोडा

१. AI टूल्स मध्ये प्रीलोडेल म्युझिक उपलब्ध असते. त्याशिवाय तुम्हाला जे म्युझिक आवडते ते तुम्ही व्हिडिओसाठी अपलोड करू शकता.

२. काही AI टूल्स च्या माध्यमातून व्हॉइस ओव्हर करण्यासाठी टेक्स्ट टू स्पीच  पिक्चर उपलब्ध करून दिले जाते. जसे की,Pictory AI. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून व्हिडिओला जोडू शकता. म्युझिक आणि आवाज एकत्र जुळवल्यामुळे व्हिडिओ अधिक प्रभावी बनण्यास मदत होते.

ट्रांजिशन्स आणि ॲनिमेशन जोडा

AI टूल्समध्ये फोटो दरम्यान ट्रांजिशन्स जोडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यामध्ये झूम इन/आउट, फेड इन/आउट, स्लाइडिंग किंवा क्लिपिंग इ. याशिवाय टेक्स्ट ॲनिमेशन स्टिकर्स किंवा इतर ग्राफिक्सचा वापर करून तुम्ही व्हिडिओ अधिक आकर्षक बनवू शकता.

व्हिडिओचे आउटपुट तपासून पहा

फोटो वरून तयार झालेला व्हिडिओ प्रिव्ह्यू करा म्हणजे व्हिडिओ तपासून पहा. जर या व्हिडिओमध्ये काही बदल हवे असतील तर एडिटिंग करून हा बदल करू शकता. व्हिडिओची गुणवत्ता निवडा यामध्ये तुम्ही 720p,1080p किंवा 4K निवडू शकता.

हे वाचा 👉  2kW सोलार सिस्टिम बसवण्यासाठी 60000 अनुदान घेतलं तर किती येईल खर्च, पहा संपूर्ण माहिती

व्हिडिओ डाऊनलोड आणि शेअर करा

व्हिडिओ तयार झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून, तुम्ही वापरत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही AI तंत्रज्ञान वापरून फोटो वरून व्हिडिओ बनवू शकता.

सदर लेखामध्ये आपण AI तंत्रज्ञान वापरून फोटो वरून व्हिडिओ कसा बनवायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या आठवणीतील चांगल्या क्षणातील फोटोचा वापर करून व्हिडिओ बनवून जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page