व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

माझी लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन, व्हॉटसअप वरून करा संपर्क | Ladaki Bahin Yojana Helpline

महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करण्यास काही महिलांना अडचणी येत होत्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने एक अनोखी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सुरु केली आहे.

या हेल्पलाईनचा उद्देश महिलांना त्यांच्या अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हा आहे. महिलांना अर्ज करताना कागदपत्रांच्या तपासणीमध्ये त्रास होत होता, काहींचे मोबाईल नंबर आधारशी लिंक नसल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या, तर काहींच्या अर्जाची स्थिती दीर्घकाळ पेंडिंग दाखवली जात होती. काहींचे सर्व असून ही पैसे आलेले नाहीत.

यासाठी राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सुरु केली आहे. महिलांनी 9861717171 या क्रमांकावर WhatsApp द्वारे संपर्क साधून आपल्या समस्यांची माहिती द्यावी. आपल्या समस्यांची माहिती दिल्यानंतर 72 तासांच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसची टीम संबंधित महिलांशी संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करेल.

हेल्पलाईनला संपर्क कसा करायचा | Contact Ladaki Bahin Helpline

  1. सर्वप्रथम 9861717171 हा क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा, आणि या नंबरवर Whatsapp व्दारे Hi पाठवा.
  2. यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल. English, हिंदी आणि मराठी पैकी कोणतीही भाषा निवडा
  3. त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यापैकी तुमचा विभाग निवडून तुमचा जिल्हा निवडा
  4. यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ दिसतील त्यापैकी तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा, आणि तुमचे लिंग निवडा.
  5. आता महाराष्ट्रतील सर्व महत्वाच्या योजनांची यादी दिसेल, त्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पर्याय निवडा.
  6. यानंतर लाडकी बहिण योजनेबद्दल आपल्या समस्येनुसार पर्याय निवडा.
  7. आता आपल्याला कोणती समस्या आहे ते सांगायचे आहे, आपली तक्रार नोंदवली जाईल.
  8. महाराष्ट्रवादी सपोर्ट टीम आपल्याशी काही दिवसात संपर्क साधून तक्रारीचे निवारण करेल.
हे वाचा-  हे करा, अन्यथा लाडकी बहिण योजनाच बंद करू, सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला तंबी

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना अनेक समस्या येत आहेत, त्यामुळे महिलांना मार्गदर्शन देण्यासाठी ही हेल्पलाईन अत्यंत उपयोगी आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page