व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये केला मोठा बदल,पहा काय आहेत? या योजनेची नवीन मार्गदर्शक तत्वे..

नमस्कार, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेमध्ये केंद्र सरकारकडून एक खूप महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आपण सदर लेखाच्या माध्यमातून या योजनेमध्ये केंद्र सरकार मार्फत कोणता बदल करण्यात आला आहे? याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेबद्दल थोडक्यात..

पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना ही देशातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक कल्याणकारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये १/१२/२०१८ पासून सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत देशातील २ हेक्‍टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या कुटुंबाला वार्षिक ६००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतु ही रक्कम ३ हप्त्यांमध्ये प्रति हप्ता २००० रुपये याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

सुरुवातीला या योजनेची असलेली २ हेक्टर जमिनीच्या निकषांमध्ये केंद्र सरकारने बदल करून सरसकट देशातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे घोषित केले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने या योजनेचे निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. म्हणूनच केंद्र सरकारने या योजनेबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

पी एम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सरकारने जाहीर केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र शासनामार्फत ६००० रुपयांची आर्थिक मदत DBT मार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. परंतु ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ३ हप्त्यांमध्ये २००० रुपये याप्रमाणे जमा करण्यात येतात.

हे वाचा 👉  तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पहा.

आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 18 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्या अगोदरच केंद्र सरकारने या योजनेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण केंद्र सरकारने याबाबत नियमावली लागू केली असून, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर यापुढे त्यातील फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळेल.

पी एम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेल्यांना मिळणार लाभ

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीच्या नावावर 2019 पूर्वी जमिनीची नोंद असेल तर, सदर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • जर लाभार्थ्याच्या नावावर 2019 नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास असा लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
  • एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी  फक्त एकच व्यक्ती यापुढे या योजनेसाठी पात्र असणार आहे.

पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार नाही

पी एम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची रक्कम दिली जाते. मात्र, सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार या शेतकऱ्यांना आता यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजनेचा लाभ कोणता शेतकरी घेऊ शकणार नाही ते आपण खाली पाहू:

  • 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन खरेदी केले आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या लाभार्थ्यांने दोन किंवा तीन वर्ष आयकर भरला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • 10,000 रुपयांपेक्षा अधिक पेन्शन जो शेतकरी घेत असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आता यापुढे घेता येणार नाही.
हे वाचा 👉  जमीन खरेदी-विक्री करतांना अशी घ्या काळजी, अन्यथा होवू शकते फसवणूक. | Land buy and sale precautions

सदर लेखामध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये केंद्र सरकारकडून जो बदल करण्यात आला आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण येथे पाहिली आहे. वरील माहिती तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडलेली असेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page