व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

CSC सेवा व्यवसाय कसा सुरू करावा | How Start CSC Service Business

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानातंर्गत देशभरात कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये बँकिंग आणि डिजिटल सुविधा पुरवण्याच्यादृष्टीने ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु केली जात आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. डिजिटल इंडिया अभियानंतर्गत आतापर्यंत देशभरात 4 लाखांहून अधिक CSC सेंटर उघडली गेली आहेत.

या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. या केंद्रांवर जन्माचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध असते. तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर सुरु करु शकता. देशातील सर्व राज्यांमध्ये CSC सेंटर्स PPP मॉडेलवर चालतात.

हे वाचा-  पीएम विश्वकर्मा योजना loan scheme: या योजनेअंतर्गत विनातारण सरकार देत आहे तीन लाख रुपये कर्ज.

CSC केंद्र कसे उघडावे, याबाबत स्टेप बाय स्टेप माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

महा ई-सेवा केंद्र (CSC) म्हणजे काय? What is a Maha e-Seva Kendra (CSC)?

केंद्र सरकारने तयार केलेल्या नॅशनल ई-गव्हर्नन्स योजनेंतर्गत, सामान्य सेवा केंद्र योजना (सीएससी), ज्याला महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्रे म्हणून ओळखले जाते, स्थापित केले गेले आहेत, जे प्राधिकृत खाजगी व्यक्तींद्वारे चालवले जातात जेणेकरून विविध सेवांमध्ये नागरिकांना सहज प्रवेश मिळू शकेल. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा.

पात्रता निकष काय आहेत? Eligibility Criteria?

  • सरकारी वेबसाइटनुसार, ग्रामस्तरीय उद्योजक (VLE) म्हणून CSC किंवा महा ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी आवश्यक आहेत:
  • त्यांच्याकडे वैध आधार क्रमांक असावा.
  • VLE हा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा गावातील तरुण असावा.
  • VLE ने किमान शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी स्तराची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • व्हीएलई स्थानिक बोली वाचण्यात आणि लिहिण्यात अस्खलित असावा आणि इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान देखील असावे.
  • मूलभूत संगणक कौशल्यांचे पूर्वीचे ज्ञान हा प्राधान्याचा फायदा असेल.
  • VLE ला सामाजिक बदलाचा प्रमुख चालक होण्यासाठी आणि अत्यंत समर्पण आणि प्रामाणिकपणाने त्याची/तिची कर्तव्ये पार पाडण्यासाठी पुरेशी प्रवृत्त केली पाहिजे.

CSC केंद्र उघडण्यासाठी विनातारण कर्ज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.👈

पुढे, व्यक्ती केंद्रासाठी मूलभूत पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे जे आहेतः

  • किमान 120 GB हार्ड डिस्क ड्राइव्ह.
  • किमान 512 MB RAM.
  • सीडी/डीव्हीडी ड्राइव्ह.
  • परवानाकृत Windows XP-SP2 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमसह UPS PC.
  • 4 तासांच्या बॅटरी बॅकअपसह/पोर्टेबल जेनसेट.
  • प्रिंटर/ कलर प्रिंटर.
  • वेब कॅम/डिजिटल कॅमेरा.
  • स्कॅनर.
  • इंटरनेटवर ब्राउझिंग आणि डेटा अपलोड करण्यासाठी किमान 128 kbps स्पीडसह इंटरनेट कनेक्शन.
हे वाचा-  Used Honda civic खरेदी करा अगदी कमी किमतीमध्ये.| Buy honda civic.

सीएससी केंद्र उघडण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

CSC च्या माध्यमातून पैसे कसे कमवाल?

कॉमन सर्व्हिस सेंटरवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी सरकारकडून 11 रुपये दिले जातात. याशिवाय, ट्रेन, विमान, बस तिकीटांच्या बुकिंगवर 10 ते 20 रुपयांची कमाई होते. तसेच एखादे बिल भरण्यासाठी आणि सरकारी योजनांमध्ये नाव नोंदवण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटरवर होऊ शकते.

SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा

भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल अ‍ॅप्लिकेशन अशा विविध माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. आजघडीला एसबीआय (SBI) ही देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी SBIकडून अनेक ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र (Custome Service Point) तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी तुम्हाला पैसे जमा करणे किंवा खाते उघडणे यासारख्या सेवा दिल्या जातात.

ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी अशाप्रकारची ग्राहक सेवा केंद्रे खूपच फायदेशीर ठरतात. कोणीही ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकतो. या माध्यमातून बऱ्यापैकी अर्थार्जनही होते. ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतात.
SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात (RBO) अर्ज सादर करावा लागतो.

https://bank.sbi/portal/web/home/branch-locator या पोर्टवरुन तुमच्या परिसरातील RBO चा पत्ता मिळेल. याशिवाय, तुम्ही जवळच्या शाखेतूनही हा पत्ता मिळवू शकता. काही खासगी कंपन्यांच्या माध्यमातूनही SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मदत केली जाते. मात्र, काहीवेळा याठिकाणी फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या माहितीचा स्रोत नीटपणे तपासावा.

हे वाचा-  Aadhar कार्डमधील मोबाइल नंबर कसा बदलायचा ?, या सोप्या स्टेप फॉलो करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment