व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आता शेतजमीन वारसा हक्क नोंदणी करता येणार घरबसल्या मोबाईलवरून.. वारसा हक्क नोंदणी कशी करायची? पहा संपूर्ण माहिती.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये शेती व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शेतजमीन विषयक महत्त्वाच्या गोष्टीसाठी शासनाच्या महसूल खात्याशी संबंध येत असतो. यातीलच एक प्रकार म्हणजे शेतजमीन वारसा हक्क नोंदणी होय. शेतजमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळवण्यासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे असते. परंतु यातील बहुतांश लोकांना वारसा हक्क नोंद कशी करायची? याबाबतची माहिती नसल्यामुळे शेतजमीन वारसा हक्क नोंदणी करायची राहून जाते.

परंतु आता वारसा हक्क नोंदणी तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने करता येते. सदर लेखांमध्ये आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने वारसा हक्क नोंदणी कशी करायची? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

वारसा हक्क नोंदणी म्हणजे काय?

वारसाहक्क नोंदणी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर कायदेशीर वारसदारांचा हक्क निश्चित करण्याची प्रक्रिया होय. यामध्ये मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन, घर, बँक खाती, शेअर्स आणि अन्य मालमत्ता कायदेशीरपणे वारसाच्या नावावर हस्तांतरित केली जाते. वारसा हक्क नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येते. ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, महापालिका यांच्याकडे अर्ज करावा लागतो. तर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी  राज्य सरकारच्या संबंधित अधिकृत संकेतस्थळावर करता येते.

वारसा हक्क नोंदणीमुळे मालमत्तेच्या अधिकारावर वाद होण्याची शक्यता कमी फोन मारताना त्यांच्या हक्काची कायदेशीर मान्यता मिळते. वारसा हक्क नोंदणी लवकरात लवकर करणे खूप आवश्यक असते, कारण सदरच्या नोंदणीमध्ये विलंब झाल्यास अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

हे वाचा 👉  सरकारी कामांसाठी वैध असलेले प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीसह असे काढा घरबसल्या मोबाईलवरून. Property card download online.

वारसा हक्क नोंदणी प्रक्रिया कशी केली जाते?

वारसा हक्क नोंदणी प्रक्रिया कशी केली जाते? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत मृत्यू नोंदणी करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर वारसा हक्क नोंदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून अर्जातील माहितीची पडताळणी केली जाते.
  • अर्ज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर फेरफार रजिस्टर मध्ये वारसा हक्क नोंदणी केली जाते.
  • 15 दिवसाच्या आत वारसा हक्क नोंदणीसाठी अंतिम आदेश काढला जातो.

वारसा हक्क नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन पद्धतीने वारसा हक्क नोंदणीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया:

  • वारस प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • शेत जमिनीची कागदपत्रे
  • वारसदारांचे ओळखपत्र व पत्त्याचे पुरावे
  • सेवा पुस्तिका (लागू असेल तर)

वारसाहक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी वेगवेगळे असतात. नॉमिनीला केवळ आर्थिक व्यवहाराचा अधिकार मिळतो, तर वारसा हक्क प्रमाणपत्रांनी जमिनीच्या मालकीचे अधिकार मिळतात.

वारसा हक्क नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

वारसा हक्क नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • ऑनलाइन वारसाहक्क नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाच्या या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼 https://bhulekh.mahabhumi.gov.in
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला 7/12 दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली यावर क्लिक करून त्यात Create New User वर क्लिक करून नोंदणी करा.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग-इन करून 7/12 Mutations पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जदाराची विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तलाठी कार्यालयामध्ये तो अर्ज पडताळला जातो, त्यानंतर फेरफार रजिस्टर मध्ये नवीन वारसाहक्क नोंद केली जाते.
हे वाचा 👉  विहीर अनुदान योजना 2024| पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन वारसाहक्क नोंदणी घरबसल्या करू शकता.

सदर लेखामध्ये आपण घरबसल्या शेत जमीन वारसा हक्क नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा वारसाहक्क नोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता. जेणेकरून तुम्हाला वारसा हक्क नोंदणीसाठी तहसील कार्यालय, महापालिका, तलाठी कार्यालय किंवा संबंधित प्राधिकरणाचे विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाहीत. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page