व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

New Earn money App । 100% Genuine । तासाला कमवा 140 रु । Best Earning App in Marathi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

या पोस्टमध्ये आपण फिलो ट्यूटर ॲप (filo Tutor App) या ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन ट्यूटर बनवून एक शाश्वत इन्कम सोर्स कसा बनवायचा? याबाबतची संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहूया.

Filo Tutor App विषयी थोडक्यात…

Filo Tutor App हे जगभरातील विद्यार्थ्यांना गृहपाठ, प्रश्न आणि नवनवीन संकल्पनांमध्ये मदत करण्यासाठी एक ऑनलाइन क्लासेस ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक खूप मोठा आणि महत्त्वाचा शैक्षणिक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे.

जर तुम्हाला एखाद्या किंवा अनेक विषयांमध्ये खूप कौशल्य आणि नॉलेज असेल आणि जर तुम्हाला सदर विषयासंबंधीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अचूकपणे देण्याचे कौशल्य असेल तर, त्या विषयांमध्ये देशभरातील विद्यार्थ्यांकडून तुम्हाला रियल टाईम क्लासरूम विनंत्या प्राप्त होतील. ज्यामुळे तुम्ही थेट सदर विषयासंबंधीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना one-on-one लाईव्ह सत्राद्वारे शिकवू शकता.

तुम्ही Filo Tutor App वरून हे लाईव्ह सत्र घरून किंवा तुम्हाला सोयीस्कर होईल अशा कोणत्याही ठिकाणाहून घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवून तुम्ही एक शाश्वत इन्कम सोर्स बनवू शकता.

Filo Tutor App वरून ऑनलाइन क्लासेस घेण्याचे फायदे

या ॲपवरून ऑनलाइन क्लासेस घेण्याचे फायदे आपण खाली पाहूया:

  • या ॲपवरून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिलेल्या प्रत्येक मिनिटासाठी तुम्हाला पैसे मिळतात, जेणेकरून तुम्ही तुमच्याकडे असलेले संबंधित विषयांचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि तुम्ही एक शाश्वत इन्कम सोर्स तयार करू शकता.
  • या ॲपवरून तुम्ही ऑनलाइन क्लासेस येण्यासाठी जी वैयक्तिक माहिती तुम्ही दिलेली आहे त्या माहितीची गोपनीयता अबाधित राहण्याची जबाबदारी संबंधित संस्थेकडे असते.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या संख्येचे त्वरित निराकरण करण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात सातत्य राहून गुणवत्तेमध्ये वाढ होते.
हे वाचा 👉  7 सीटर SUV खरेदी करा फक्त 1 लाख 30 हजार रुपयांमध्ये. |Used suv car for sale

Filo Tutor App वरून ऑनलाइन क्लासेस घेण्यासाठीची आवश्यक पात्रता

Filo Tutor App वरून जर तुम्ही एखाद्या किंवा अनेक विषयांचे ऑनलाईन क्लासेस घेण्यासाठी इच्छुक असाल तर, तुमच्याकडे काही पात्रता असणे आवश्यक आहे. सदरच्या पात्रता कोणत्या आहेत हे आपण खाली पाहूया:

  • या ॲपवरून ऑनलाइन क्लासेस घेण्यासाठी तुमच्याकडे किमान पदवी किंवा तत्सम पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार केला जातो.
  • या ॲपवरून ऑनलाइन क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला तुमची ओळख, पात्रता आणि अध्यापन क्षमता पडताळण्यासाठी एक साधी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

Filo Tutor App वरून ऑनलाइन क्लासेस घेण्याची प्रक्रिया

Filo Tutor App वरून ऑनलाइन क्लासेस कसा घ्यायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून Filo Tutor App डाउनलोड करावे लागेल.👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.filo.tutor
  • हे ॲप ओपन करून यामध्ये तुमच्या वैयक्तिक तपशिलासह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • त्यानंतर वैध फोटो ओळखपत्र (आधार कार्ड/कॉलेजचे ओळखपत्र) ॲपवरील तुमचा अलीकडील फोटो, व्हिडिओ- आधारित केवायसी, पैसे मिळवण्यासाठी पॅन कार्ड पडताळणी या गोष्टींचा समावेश असलेली एक साधी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह सत्र घेणे सुरू करू शकता. या सत्रांमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्याकडे असलेले कौशल्य शिकवू शकता.
हे वाचा 👉  HSRP नंबर प्लेट : १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी नवी नियमावली. | New rule for 15 year old vehicles on hsrp number plate

Filo Tutor App कशा पद्धतीने काम करते?

  • सर्वप्रथम तुम्हाला Filo Tutor म्हणून, तुम्ही इच्छा विषयांमध्ये मास्टर आहात त्या विषयांमधील संकल्पना आणि त्या विषयांसंबंधित प्रश्न, नवनवीन संकल्पना समजून घेण्यासाठी मदत मागणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला सूचना प्राप्त होतील.
  • त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आधीच पाहू शकाल जेणेकरून तुम्ही या प्रश्नास चे उत्तर देण्यासाठी कनेक्ट व्हायचे की नाही हे ठरवू शकता.
  • जर तुम्ही लाईव्ह सत्र घेण्याचे निवडले तर काही सेकंदांमध्येच तुम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओ लाईव्ह सत्राद्वारे विद्यार्थ्यांशी जोडले जाल.
  • विद्यार्थ्यांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ सत्राद्वारे जोडल्यानंतर एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटे लागू शकतात. परंतु तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आवश्यक वाटेल तोपर्यंत तुम्ही हे लाईव्ह सत्र घेऊन पैसे कमवू शकता.

या पोस्टमध्ये आपण Filo Tutor App वरून ऑनलाइन क्लासेस घेऊन एक शाश्वत इन्कम सोर्स कसा बनवायचा? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. जर तुम्ही सुद्धा वेल एज्युकेटेड असून एखाद्या किंवा अनेक विषयांमध्ये कौशल्य प्रदान केले असेल तर, या ॲपवरून ऑनलाइन क्लासेस घेऊन एक चांगला शाश्वत इन्कम सोर्स बनवू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page