व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

Ladki bahin yojana: अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर “In Pending To Submitted” असा पर्याय दिसत असल्यास काय करावे.

अर्ज सबमिट न झाल्यास काय करावे?

Ladki Bahin Yojana Form: काही अर्जदारांना अर्ज सबमिट झाला की नाही याबाबत चिंता आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर “In Pending To Submitted” असा पर्याय दिसत असल्यास, ही बातमी वाचा.

अर्जाची यशस्वी नोंदणी

महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. ३० ते ४० वयोगटातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यात वैवाहिक, घटस्फोटीत, आणि अविवाहित महिलांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी नोंदी आहेत.

नारीशक्ती दूत ॲपमुळे सोपी प्रक्रिया

नारीशक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत आणि आतापर्यंत ८८ लाख डाऊनलोड्स झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला या ॲपचे ८०० डाऊनलोड्स होत असून, प्रत्येक मिनिटाला ६५० अर्ज सादर केले जात आहेत.

अर्ज सबमिट का झाला नाही?

काही अर्जदारांना अर्ज सबमिट झाली की नाही याबाबत चिंता आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर “In Pending To Submitted” असा पर्याय दिसत असल्यास, घाबरु नका. हे म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर झाला नाही. अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ट पातळीवर अर्ज चेक करणे अजून बाकी आहे. लवकरच तुमचा अर्ज चेक केला जाईल.

हे वाचा-  किसान मानधन योजनेसाठी अर्ज करा | apply for kisan mandhan yojana

अर्ज दुरुस्त करण्याची संधी

तिसरा पर्याय “Edit” चा आहे. तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट करू शकता.

ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

आतापर्यंत १ कोटी ३० लाख ऑनलाईन आणि ५० लाख ऑफलाइन अर्ज सादर झाले आहेत. या योजनेसाठी सरकारने २ कोटी ते २.५ कोटी महिला पात्र ठरतील असे उद्दिष्ट ठेवले आहे. आज ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आलेले अर्ज स्वीकारण्यात येतील.

पैसे कधी मिळणार?

अर्ज केलेल्या ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३,००० रुपये जमा होतील.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page