व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सोलर पंपाच्या किंमती अचानक झाल्या कमी, सोलर पंपाचे नवीन दर झाले जाहीर.. पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार शेतकरी बांधवांनो, या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सोलर पंपाच्या किंमती अचानक कमी झाल्या आहेत. सोलर पंपाच्या किंमती कमी झाल्यामुळे  सोलर पंपाचे नवीन दर जाहीर झाले आहेत. हे जाहीर झालेले नवीन दर किती आहेत? हे आपण सविस्तर पाहूया.

आपल्या देशाची संपूर्ण जगभरामध्ये कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे. देशातील सुमारे 50 टक्के पेक्षा जास्त लोक या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. शेती हेच यांच्या प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. परंतु शेती व्यवसाय करत असताना सिंचन व्यवस्था महत्त्वाची आहे. जर पाणी नसेल तर तुम्हाला शेती करणे खूपच अवघड होते. हीच एक मोठी समस्या महाराष्ट्रातील किंबहुना देशातील शेतकऱ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न घेऊन उभी आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर राज्यामध्ये बहुतांश भाग हा दुष्काळी आहे. याठिकाणी अनियमित पाऊस आणि भूजल पातळीतील घट यासारख्या समस्या आहेत. अशा ठिकाणी शेतीसाठी सिंचन व्यवस्था करणे खूपच महत्त्वाचे आहे म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू केली आहे, या योजनेलाच महाराष्ट्रामध्ये मागेल त्याला सौर पंप योजना या नावाने ओळखले जाते.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना उद्दिष्टे

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढवून पर्यावरणाचे संवर्धन करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून देणे. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त आणि विश्वसनीय सौर ऊर्जेचा पुरवठा करणे.
  • डिझेल पंपासारख्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर चालणाऱ्या साधनांचा वापर कमी करून शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे.
  • ग्रीड कनेक्टेड या पारंपारिक वीज यंत्रणेवरील भार कमी करणे.
  • प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यास मदत करणे.
हे वाचा 👉  कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी सेट व सेफ्टी किट. | Kitchen set and and safety kit for contruction workers.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना फायदे

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे काय आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • या योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना  शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणारे सोलर पंप हे सौर उर्जेवर चालत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये बचत होणार आहे.
  • अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर या योजनेअंतर्गत होणार असल्यामुळे त्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर कमी होईल आणि पर्यावरणीय प्रदूषणाला आळा बसेल.
  • बारमाही पाणी व वीज बिलामध्ये बचत यासारख्या गोष्टीमुळे शेतकऱ्याची उत्पादकता वाढून तो आर्थिक स्थिरता प्राप्त करेल.

कुसुम सोलर पंपाच्या किंमती-2025

कुसुम सोलर पंपाच्या किमती या त्या पंपाच्या क्षमतेनुसार आहेत. सन 2025 मधील जीएसटीसहित कुसुम सोलर पंपाच्या किमती आपण खाली पाहूया:

  • 3 एचपी सोलर पंप- 1,93,803 रुपये
  • 5 एचपी सोलर पंप- 2,69,746 रुपये
  • 7.5 एचपी सोलर पंप- 3,74,402 रुपये

जमिनीच्या क्षेत्रानुसार सोलर पंपाचे वाटप

तुमच्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तुम्हाला या योजनेअंतर्गत पंपाचे वाटप केले जाते. त्यानुसार..

  • तुमच्याकडे जर 1 ते 3 एकर जमिनीचे क्षेत्र असेल तर, तुम्हाला 3 एचपी सोलर पंपासाठी तुम्ही पात्र ठरता.
  • 3 ते 5 एकर जमीन क्षेत्रासाठी 5 एचपी सोलर पंपासाठी तुम्ही पात्र ठरता.
  • जर तुमच्याकडे 5 कर पेक्षा अधिक शेतजमीन असेल तर, तुम्ही 7.5 एचपी सोलर पंपासाठी पात्र ठरतात.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनासाठी लाभार्थी निवड

कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण करावे लागतात. हे निकष कोणते आहेत? ते आपण खाली पाहूया:

  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी जो शेतकरी अर्ज करणार आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज जोडणी केलेली नसावी.
  • सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बारमाही पाणी स्त्रोत असावेत. यामध्ये विहीर, बोरवेल, नदी इ.
  • सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
हे वाचा 👉  मुलींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! शाळेच्या गणवेशात हद्दच पार केली, VIDEO पाहून बसेल धक्का

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत विविध प्रवर्गासाठी अनुदान आणि लाभार्थी हिस्सा

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत विविध प्रवर्गासाठी अनुदान आणि लाभार्थी हिस्सा स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. ते आपण खाली सविस्तर पाहूया:

सर्वसाधारण गट

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत एकूण अनुदानापैकी 60% अनुदान केंद्र सरकार आणि 10% अनुदान राज्य सरकारकडून दिले जाते. तर उर्वरित रक्कम म्हणजेच 30% लाभार्थीला स्वतः भरावी लागते.

3 एचपी सोलर पंप

  • एकूण किंमत: 1,93,803 रुपये
  • केंद्र सरकार अनुदान (60%): 1,16,282 रुपये
  • राज्य सरकार अनुदान (10%): 19,380 रुपये
  • लाभार्थी हिस्सा (30%): 58,141 रुपये

5 एचपी सोलर पंप

  • एकूण किंमत: 2,69,746 रुपये
  • केंद्र सरकार अनुदान (60%): 1,61,848 रुपये
  • राज्य सरकार अनुदान (10%): 26,975 रुपये
  • लाभार्थी हिस्सा (30%): 80,923 रुपये

7.5 एचपी सोलर पंप

  • एकूण किंमत: 3,74,402 रुपये
  • केंद्र सरकार अनुदान (60%): 2,24641 रुपये
  • राज्य सरकार अनुदान (10%): 37,440 रुपये
  • लाभार्थी हिस्सा (30%): 1,12,321 रुपये

अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग (SC/ST)

अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी केंद्र सरकारकडून 75% अनुदान तर राज्य सरकारकडून 15% अनुदान दिले जाते. लाभार्थ्याला फक्त 10% रक्कम भरावी लागते.

3 एचपी सोलर पंप

  • एकूण किंमत: 1,93,803 रुपये
  • केंद्र सरकार अनुदान (75%): 1,45,352 रुपये
  • राज्य सरकार अनुदान (15%): 29,070 रुपये
  • लाभार्थी हिस्सा (10%): 19,381 रुपये

5 एचपी सोलर पंप

  • एकूण किंमत: 2,69,746 रुपये
  • केंद्र सरकार अनुदान (75%): 2,02,310 रुपये
  • राज्य सरकार अनुदान (15%): 40,462 रुपये
  • लाभार्थी हिस्सा (10%): 26,974 रुपये
हे वाचा 👉  HSRP नंबर प्लेट : १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी नवी नियमावली. | New rule for 15 year old vehicles on hsrp number plate

7.5 एचपी सोलर पंप

  • एकूण किंमत: 3,74,402 रुपये
  • केंद्र सरकार अनुदान (75%): 2,80,802 रुपये
  • राज्य सरकार अनुदान (15%): 56,160 रुपये
  • लाभार्थी हिस्सा (10%): 37,440 रुपये

लघु व सीमांत शेतकरी

लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत विशेष अनुदान देण्यात आले आहे. लघु व सीमांत शेतकरी प्रवर्गासाठी केंद्र सरकार 70% अनुदान तर राज्य सरकारकडून 20% अनुदान दिले जाते व लाभार्थ्याला उर्वरित 10% रक्कम भरावी लागते.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • या योजनेसाठी जर तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज करत असाल तर, या संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://www.mahaja.com
  • सदरच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल यामध्ये विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती व या योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. (जमिनीचा ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पाणी प्रमाणपत्र इ.)
  • वरील अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जामध्ये दिली गेलेली माहितीची पुन्हा एकदा पडताळणी करून अर्ज सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.

या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेविषयीची माहिती त्याचबरोबर कुसुम सोलर पंपाच्या किमतीमध्ये झालेली घसरण व सदर पंपाचे नवीन दर ही माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page