व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

आप्पाचा विषय लई हार्ड ये गाण्यावर अशोक सराफ यांचा डान्स, पहा धमाल व्हायरल व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड् पाहायला मिळत आहेत. हे ट्रेंड्स कधी एखाद्या गाण्याच्या धुंद लयीवर बनलेल्या रील्सच्या रूपाने येतात, तर कधी डान्सच्या हटके स्टेप्सच्या माध्यमातून लोकप्रिय होतात. त्याच पार्श्वभूमीवर एक धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि विनोदाचा बादशाह अशोक सराफ यांना एका ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना पाहू शकतो. सध्या आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं आहे, ज्यावर अनेकांनी रील्स तयार केल्या आहेत. परंतु, अशोक सराफ यांच्या स्टाईलमध्ये याच गाण्यावरचा डान्स पाहून लोकांना हसू आवरता येत नाही.

पहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ एडिट करून केलेला असून, अशोक सराफ यांनी त्यांच्या विविध चित्रपटांमध्ये केलेल्या डान्सच्या क्लिप्स एकत्र करून तयार केला आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं ठेवण्यात आलं आहे. हे क्लिप्स इतक्या कौशल्याने एकत्र केल्या आहेत की ते पाहून असं वाटतं की खुद्द अशोक सराफ याच गाण्यावर नृत्य करत आहेत. या व्हिडिओमध्ये विनोद आणि क्रिएटिव्हिटीचा समावेश आहे.

Marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाख 61 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियांची बरसात केली असून, अशोक सराफ यांच्या हास्याने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला देखील सांगा!

हे वाचा-  CSC केंद्र सुरू करण्याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती |how to apply for CSC Service center.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page