व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आता घरबसल्या आयुष्मान भारत योजनेचं लाभ मिळावा; एका क्लिकवर मिळतील A टू Z मेडिकल रिपोर्ट्स.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आभा (ABHA – Ayushman Bharat Health Account) कार्ड हे एक डिजिटल हेल्थ आयडी आहे. यामध्ये 14 अंकी नंबर असतो. जो तुमच्या वैद्यकीय नोंदींसाठी वापरला जातो. या कार्डाच्या मदतीने तुमचे मेडिकल रेकॉर्ड, प्रिस्क्रिप्शन आणि इतर आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाऊ शकते. कोणते मेडिकल रिपर्ट हरवले तर या आयडीवर ते डिजिटल स्वरुपात मिळू शकते. म्हणून आभा कार्ड तुम्हला नक्कीच कामी येईल.

आभा कार्डचे फायदे

आभा कार्डचे फायदे

आरोग्य सुविधा मिळवणे होईल सोप्पे: या कार्डमुळे वैद्यकीय उपचारांची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवता येते. सरकारी योजनांचा लाभ: आभा हेल्थ कार्ड असलेल्या व्यक्तींना आयुष्मान भारत योजनेचे लाभ मिळू शकतात. भारतात सगळीकडे वैध: कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात डॉक्टर तुमचे मेडिकल रेकॉर्ड सहज पाहू शकतात.

OPD : सरकारी रुग्णालयात OPD तिकीट डिजिटल स्वरूपात मिळू शकते. तुमचा वेळ वाचेल OPD मिळवण्यासाठी लांब रांगेत उभं राहवं लागणार नाही विमा आणि इतर सरकारी योजनांशी जोडणी: आभा कार्डमुळे आरोग्य विमा आणि सरकारी योजना यामध्ये सहभागी होणे सोपे होते. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अन्य आयुष उपचारांमध्ये देखील उपयोगी पडेल.  

आभा हेल्थ आयडी कशी तयार करायची

आभा हेल्थ कार्ड ऑनलाईन पद्धतीने सहज तयार करता येते. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा

  • 1. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – abha.abdm.gov.in
  •  2. “क्रिएट आभा नंबर” या पर्यायावर क्लिक करा.
  • 3. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरून तुमची ओळख पडताळा निवडा.
हे वाचा 👉  फ्लॅट किंवा जमीन – कुठे गुंतवणूक करावी? जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय. Flat or land, where to invest? Lets know.

4. आधार नंबर किंवा मोबाइल नंबर टाका व OTP टाकून व्हेरिफाय करा. 5. आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. 6. तुमची आभा हेल्थ आयडी तयार होईल.

आभा हेल्थ कार्ड हे तुमच्या वैद्यकीय नोंदी एकत्र ठेवण्याचे एक आधुनिक साधन आहे. कोणत्याही लांबच्या रुग्णालयात जायचे असेत तरी हा कार्ड उपयोगी पडते कारण तुम्हला कोणतेही कागदपत्र सोबत घ्यावे लागणार नाही. तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट या कार्डवर उपलब्ध असतील. यामुळे आरोग्य सुविधा आणखी सोपी होईल. शासनाकडून मिळणाऱ्या योजना सहज उपलब्ध होतील आणि वैद्यकीय उपचार घेताना वेळ वाचेल. धावपळ कमी होईल. जर तुमच्याकडे आभा हेल्थ आयडी नसेल, तर आजच नोंदणी करा आणि या सुविधेचा लाभ घ्या.  

ही सेवा मोफत आहे. कोणत्याही प्रकारचा पैश्यांचा व्यव्हार करु नका. फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे नोंदणी करा. तपासल्याशिवाय कोणलाही OTP शेअर करु नका. तुमच्या संमतीशिवाय कोणीही तुमचे हेल्थ रेकॉर्ड पाहू शकत नाही.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page