या पोस्टमध्ये आपण आधार कार्डवरून म्हणजेच आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया.
आज-काल बहुतांश ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. पूर्वी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करावा लागत असे. अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असे. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पॅन कार्ड ची अनेक दिवस वाट पहावी लागायची. ही प्रक्रिया खूपच वेळ खाऊ होती.
पण आता सरकारने डिजिटल इंडिया उपक्रमामुळे तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकच्या मदतीने काही मिनिटांतच ई-पॅन डाऊनलोड करून घेऊ शकता.
ई-पॅन कार्ड काय आहे?
ई-पॅन हे डिजिटल स्वरूपातील पॅन कार्ड आहे. हे तुम्हाला फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येते. ई-पॅन हा एक अधिकृत सरकारी दस्तऐवज आहे, जो सामान्य पॅन कार्डप्रमाणेच वैद्य आहे. बँकिंग व्यवहार, सरकारी योजना, टॅक्स भरणे आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे पॅन कार्ड पूर्णपणे वैध आहे.
ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याचे फायदे
आधार कार्ड क्रमांकावरून ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते आहेत ते आपण खाली पाहूया:
- आधार कार्ड क्रमांकाच्या साह्याने अगदी काही मिनिटांमध्ये पॅन कार्ड डाउनलोड करून घेता येते.
- मी पॅन कार्ड पहिल्यांदा डाउनलोड केल्यास तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.
- जर तुमचे मूळ पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्हाला आधार कार्ड क्रमांकावरून त्वरित ई-पॅन कार्ड डाऊनलोड करून कोणत्याही कामांसाठी याचा वापर करू शकता.
- ई-पॅन कार्ड कोणत्याही सरकारी आणि बँकिंग कामासाठी वैध आहे.
ई-पॅन कार्ड कोण डाऊनलोड करू शकतो?
जर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाउनलोड करायचे असेल, तर खाली दिलेल्या काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. तरच तुम्ही आधार क्रमांक वरून ई-पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता, या अटी कोणत्या आहेत त्या आपण खाली पाहूया:
- तुमच्याकडे पॅन कार्ड आधीपासूनच असणे आवश्यक आहे.
- तुमचा आधार क्रमांक पॅन कार्डची लिंक असणे गरजेचे आहे.
- तुमच्या आधार कार्डची जोडलेला मोबाईल नंबर ओटीपी साठी सक्रिय असणे गरजेचे आहे.
वरील तीन अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल, तर तुम्ही सहजपणे आणि तात्काळ ई-पॅन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता.
ई-पॅन कार्ड डाऊनलोड कसे करायचे?
फक्त आधार कार्ड क्रमांकाच्या साह्याने तुम्ही ई-पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता. ई-पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
https://www.incometax.gov.in
- या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला “इन्स्टंट ई-पॅन”या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर “Get New e-PAN”किंवा “Check Status/Download PAN” यापैकी योग्य पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आधार क्रमांक टाकून “Continue” या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल, तो OTP टाका आणि “Validate”बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे ई-पॅन कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- “Download PAN” बटनावर क्लिक करून तुमचे डिजिटल पॅन कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त आधार कार्ड क्रमांकाच्या साह्याने डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता.
जर तुम्हाला फिजिकल पॅनकार्डची आवश्यकता असेल, तर तुम्ही NSDL/UTIITSL कडून अर्ज करून मागवू शकता. परंतु या डिजिटल युगामध्ये ई-पॅन कार्ड ही सर्व आर्थिक व्यवहारासाठी त्याचबरोबर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वैध आणि सोयीस्कर पर्याय आहे.
या पोस्टमध्ये आपण फक्त आधार कार्ड क्रमांकाच्या साह्याने ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही फक्त आधार क्रमांकाच्या साह्याने ई-पॅन कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद!