व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Aadhar कार्डमधील मोबाइल नंबर कसा बदलायचा ?, या सोप्या स्टेप फॉलो करा.

आधार कार्ड बनवताना तुम्ही जो मोबाइल नंबर दिला आहे. तो आता तुम्ही वापरत नसाल तर आता जो फोन वापरत असाल तो तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करू शकता. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर अपडेट करू शकता.

आधार कार्ड (Aadhaar Card) आज खूपच आवश्यक डॉक्यूमेंट्स बनले आहे. बँक खाते उघडण्यापासून अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जात आहे. आधार कार्डचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यातील फोन नंबर बरोबर असणे आहे. जर आधार कार्ड बनवताना मोबाइल नंबर तुम्ही जर आता वापरत नसाल तर हे तुमच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे आताच त्यात दुरुस्ती करून नवीन मोबाइल नंबर अपडेट करू शकता.

नंबर बदलण्यासाठी सर्वात आधी UIDAI ची वेबसाइट, mAadhaar App किंवा १९४७ या नंबवर कॉल करून आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रला लोकेट करा.

आता आधार कार्ड वरून काढता येणार पैसे बँकेत जाण्याची गरज नाही.

Aadhar card number change

तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाइन जवळच्या आधार सेवा केंद्राची अप्वॉइंटमेंट घेऊ शकता.

तुम्हाला मिळालेल्या तारखेच्या दिवशी मोबाइल घेऊन जवळच्या आधार सेवा केंद्रावर भेट द्या.

या ठिकाणी एक अपडेट फॉर्म भरावे लागेल. यावर तुम्हाला सध्या मोबाइल नंबर अॅड करावे लागेल.

हे वाचा-  IGI Aviation Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांसाठी 1074 रिक्त पदांची ऑनलाईन भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

यासाठी तुम्हाला ५० रुपये फी जमा करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशनसाटी आपली ओळखची व्हेरिफिकेसन करावे लागेल.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल. ज्यात यूनीक रेफरेंस नंबर (URN) असणार आहे. याच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता. तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट झाला की नाही.

असे जाणून घ्या आधार मध्ये कोणता मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहे
स्टेप १. सर्वात आधी www.uidai.gov.in वर जा.
स्टेप २. माय आधार टॅबमध्ये व्हेरिफाय ईमेल, मोबाइल नंबर सिलेक्ट करा.
स्टेप ३. तुमच्या सिस्टमवर एक नवीन टॅब उघडेल. या ठिकाणी आधार नंबर टाका. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाका. ज्याला तुम्ही व्हेरिफाय करू इच्छिता.
स्टेप ४. कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment