व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

या तारखेपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा | update Aadhar Card

Aadhar card update

आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी महत्वाचे ओळखपत्र आहे.कोणतेही शासकीय अथवा निमशासकीय काम आधार कार्ड विना पूर्ण होत नाही. भारतात साधे एक सिम कार्ड काढायचे असले तरी देखील आधार कार्ड लागते. बँक खाते उघडणे, पॅन कार्ड काढणे, शासकीय योजनांचा लाभ घेणे,रेशन कार्ड काढण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी, मतदान कार्ड काढण्यासाठी, मतदान करण्यासाठी, केवायसी करण्यासाठई अशा अनेक गोष्टींसाठी याची आवश्यकता असते.

विशेष म्हणजे जर तुम्ही कर्ज काढत असाल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू फायनान्स वर खरेदी करत असाल तरी तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागते. याशिवाय इतरही अन्य छोट्या मोठ्या कामांसाठी आधार कार्डचा उपयोग होतो. यावरून आधार कार्ड हे एक महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे हे आपल्याला समजते. मात्र हे शासकीय दस्तऐवज अपडेटेड असणे आवश्यक आहे.

याच आधारकार्डमध्ये काही त्रुटी असल्यावर ऐनवेळी मोठी पंचाईत होते. हीच अडचण होऊ नये यासाठी यूआयडीएआयने लोकांना एक मोठी संधी दिली आहे. आता कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधारकार्डमधील माहिती अपडेट करता येणार आहे. यूआयडीएआयने नेमका काय निर्णय घेतला आहे? मोफत आधारकार्ड अपडेट करायचे असेल तर काय करायला हवे? त्यासाठीची पूर्ण प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊ या…

हे वाचा-  तुम्ही कोणत्या कंपनीचे वॅक्सिन घेतले आहे आता मोबाईलवर शोधा | Eka Care ॲप vaccine डाऊनलोड करा.

तुमच्या आधार कार्ड वर तात्काळ पन्नास हजार रुपयांचा लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

आधार कार्ड अपडेट:

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून भारतीय नागरिकांना आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.हे कार्ड जर 10 वर्षांपूर्वी बनवलेले असेल तर ते अपडेट करणे आवश्यक आहे.

मात्र 14 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली ही सुविधा नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक्सटेंड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची अंतिम मुदत 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२४ आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता यांसारखी माहिती विनामूल्य बदलू शकता.

myAadhaar Portal वर आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा 14 जून पर्यंत मोफत राहणार आहे. जर तुम्हालाही तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल तर यासाठी सर्व प्रथम uidai च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थातच https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागणार आहे. या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला याच्या होमपेजवरील My Aadhaar Portal वर जावे लागणार आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून आधार कार्ड अपडेट करा.

हे वाचा-  pm suryaghar yojana 2024 in marathi | सूर्यघर योजनेअंतर्गत ७८ हजार रुपये सबसिडी सह 300 मोफत वीज मिळणार

घरबसल्या आधार कार्ड कसं अपडेट करायचं ते येथे पहा:

  1. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://uidai.gov.in/
  2. “My Aadhaar” पोर्टलवर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून लॉग इन करा.
  3. “Update Demographic Data” पर्याय निवडा.
  4. तुम्हाला बदल करायची असलेली माहिती निवडा आणि योग्य ती माहिती द्या.
  5. जर तुम्ही तुमचा पत्ता बदलत असाल तर तुम्हाला तुमच्या नवीन पत्त्याचा पुरावा अपलोड करावा लागेल.
  6. सर्व माहिती योग्य आहे याची खात्री करा आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
  7. तुम्हाला तुमच्या अपडेट केलेल्या आधार कार्डची PDF कॉपी मिळेल.

जर डेमोग्राफिक माहिती चुकीची असेल किंवा तुम्हाला तुमच्या डेमोग्राफिक माहितीमध्ये काही बदल करायचे असतील तर ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडून दस्तऐवज अपलोड करावे लागणार आहेत. हे दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF स्वरूपात अपलोड केले जाऊ शकतात. पण, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे.

ऑफलाईन अपडेट करण्यासाठी खर्च

  • तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील बायोमेट्रिक माहिती (फोटो आणि fingerprints) अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला ₹100 शुल्क द्यावे लागेल.
  • तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटरवर जाऊनही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला ₹50 शुल्क द्यावे लागेल.
हे वाचा-  टाटा योद्धा गाडी घ्या फक्त एक लाख रुपयामध्ये | tata yoddha buy at low price.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment