व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान जाहीर: जिल्हा उपनिबंधक

शेतकऱ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कठोर अटींमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, जाचक अटींमुळे अनेक शेतकरी मागे पडले होते, परंतु आता शासनाने अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग सुकर केला आहे….

राज्य सरकारच्या नियमित कर्जफेड योजनेचा  राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र ऊस उत्पादक शेतकरी जास्त आहेत. उसासाठी एकाच वर्षात दोनदा उचल घेतलेले १४ हजार शेतकरी या योजनेतून  ठरत होते. यामुळे  शेतकरी संघटनांनी बऱ्याच वेळा जोरदार आंदोलन देखील केले होते. आता  शासनाने मूळ  निकषात बदल करून एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.

50 हजार रुपयांपासून एक लाख रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

परतफेड वर्षे आणि वितरण निकषांबद्दल स्पष्टता

सरकारी अधिकाऱ्यांच्या अलीकडील स्पष्टीकरणांनी ५०००० रुपये अनुदानाच्या पात्रतेसाठी परतफेडीची वर्षे आणि वितरणाचे निकष ठरवण्यासाठी मार्गदर्शन दिले आहे, शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निराकरण केले आहे.

हे वाचा-  Union budget 2024: देशाचा अर्थसंकल्प झाला जाहीर; केंद्र सरकारने केलेल्या या महत्त्वाच्या घोषणा!

कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी सांगितले की, सहकार विभागाने ठरवून दिलेल्या तीन वर्षांपैकी केवळ 2017-18 या वर्षात 1,400 शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाची दोनदा परतफेड केली. आचारसंहितेमुळे शासनाच्या मान्यतेनंतर, येत्या आठ दिवसांत अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान जमा केले जाईल.  ज्या पात्र शेतकऱ्यांनी  एकाच वर्षात दोनदा कर्ज घेऊन कर्जाची परतफेड केली आहे त्यांना कसा लाभ द्यायचा हा प्रश्न शासकीय यंत्रणेपुढे होता. शेतकऱ्यांसाठी हा  लाभ सुनिश्चित करण्यासाठी समायोजन केले गेले.

तथापि, अनेक वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभांच्या वाटपाबाबत प्रश्न राहिले. सहकार आयुक्तांच्या मार्गदर्शनाने स्पष्ट केले की, सहकार विभागातील उर्वरित काम करून पुढील वर्षांत लाभांचे वाटप केले जाईल.

50 हजार रुपये ते एक लाख रुपये मिळवण्यासाठी क्लिक करा.

काही शेतकऱ्यांनी २०१७- १८ व २०१८-१९ आणि २०१८-१९ व २०१९-२० आर्थिक वर्षात कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केली होती, मग अश्या शेतकऱ्यांना नेमका कोणत्या वर्षाचा लाभ द्यायचा हा प्रश्न यंत्रणेसमोर होता.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते. बुधवारी जर शेतकऱ्याने  २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात कर्ज घेतले असेल तर  २०१८-१९ वर्षाचा लाभ, आणि जर शेतकऱ्याने २०१८-१९ व २०१९-२० वर्षात कर्ज घेतले असेल तर २०१९-२० वर्षातील रकमेचा लाभ देण्याचे ठरविले आहे.

हे वाचा-  या महिलांना तत्काळ करावी लागणार eKYC अन्यथा बंद होणार सबसिडी

कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदान वितरणाच्या गुंतागुंतीचा निराकरण

अलीकडच्या घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची किचकट प्रक्रिया अखेर सुटली आहे.

वरील निकष वापरून 50,000 हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान जाहीर: जिल्हा उपनिबंधक”

Leave a Comment