व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयांकडून झाली प्रसिद्ध, पात्रता फक्त 12वी पास.. जाणून घ्या सविस्तर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून आपण नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ची जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

राज्यामध्ये नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक 12वी उत्तीर्ण उमेदवारांना आधार केंद्र मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. सद्यस्थितीला ज्या महसूल मंडळात आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. यामुळेच आधार केंद्राकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर असे देखील सांगण्यात आले आहे की, पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

आधार सेवा केंद्र जाहिरात ठळक मुद्दे

  • आधार सेवा केंद्र जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत प्रसिद्ध केली गेली आहे.
  • शैक्षणिक पात्रता: आधार सेवा केंद्र मागणीबाबत अर्ज करणाऱ्या अर्जदाराने 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आधार सेवा केंद्र जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇 https://drive.google.com/file/d/1AXTcRJP4QRvMlp-PZCMZZOJjPEbMOdap/view?usp=drivesdk
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 2 एप्रिल 2025 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.
  • निवड प्रक्रिया: 9 एप्रिल 2025 रोजी प्राप्त झालेल्या अर्जातील पात्र अर्जदारांमधून लकी ड्रॉ पद्धतीने आधार सेवा केंद्र/आधार संच/किट वितरित करण्यात येईल.

आधार सेवा केंद्र मागणीसाठीच्या अटी व शर्ती

आधार केंद्र मागणीसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर, तुम्हाला काही अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे आहे. सदरच्या अटी व शर्ती कोणते आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • आधार केंद्र/आधार संच/किटकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑपरेटर/सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • आधार केंद्र मागणीसाठी अर्जदार केवळ एका जागेसाठीच अर्ज करू शकतो.
  • त्याचबरोबर सदरच्या उमेदवाराकडे UIDAI च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वैध सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आधार केंद्र मागणीसाठी अर्ज करणारा अर्जदार ज्या तालुक्यात स्वतःचे सरकार सेवा केंद्र चालवीत आहे त्याच तालुक्यात त आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतो. तालुक्याच्या बाहेरील अर्ज बाद करण्यात येतील.
  • आधार केंद्र नेमून दिलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे बंधनकारक राहील.
  • आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालवतील, त्या कार्यालयाकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे बंधनकारक राहील.
  • कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार केंद्र मिळणेबाबतचे अर्ज कार्यालयात प्रत्यक्षरीत्या स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे जे अर्जदार आधार केंद्र मिळणेबाबत अर्ज करणार आहेत त्यांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
हे वाचा 👉  आधार कार्डद्वारे पर्सनल आणि बिझनेस लोन कसे घ्यावे? PMEGP लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

आधार सेवा केंद्र मागणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

आधार केंद्र मागणीसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर, तुम्हाला अर्जासोबत काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत? ही आपण खाली पाहूया:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आधार NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (किमान 12वी – HSC)
  • आधार केंद्र चालक ज्या शासकीय कार्यालयात आधार केंद्र चालवणार आहेत, त्या कार्यालयाचे नाहरकत (NOC) प्रमाणपत्र

आधार सेवा केंद्र मागणीसाठी अर्ज कसा करायचा?

आधार सेवा केंद्र मागणीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर, तुम्हाला हा अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया.

  • सर्वप्रथम तुम्हाला आधार सेवा केंद्र मागणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6Uui3O1DxmCQte8xKhFyeDKSFtpuoJ9LK7PgbzDRtFtreYw/viewform
  • सदरच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार सेवा केंद्र मागणीसाठीचा अर्ज ओपन होईल.
  • या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अगदी अचूकपणे आणि काळजीपूर्वक भरून आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
  • त्यानंतर पुन्हा एकदा आपण दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का हे तपासून अर्ज सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्हाला आधार सेवा केंद्र मागणीबाबतचा अर्ज ऑनलाइन करता येतो.

या पोस्टमध्ये आपण आधार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची जी जाहिरात जिल्हाधिकार्यालयांकडून प्रसिद्ध केली गेली आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. जर तुम्ही सुद्धा आधार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत इच्छुक असाल, तसेच सदरच्या अटी व शर्ती तुम्ही पूर्ण करत असाल तर, या माहितीच्या आधारे आधार सेवा केंद्र मिळणेबाबत ऑनलाइन अर्ज करून आधार सेवा केंद्र सुरू करू शकता. धन्यवाद!

हे वाचा 👉  डेटा मॅचिंग ते क्रॉस चेंकिग, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार? कशी असेल प्रक्रिया?

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page