नमस्कार मित्रांनो, भारतातमध्ये गाडी चालवण्यासाठी मग ती गाडी दुचाकी असो वा चारचाकी ड्रायव्हिंग लायसन्स हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे, ज्याला आपण वाहन चालक परवाना असे सुद्धा म्हणतो. वाहन अधिनियम 1988 अन्वये तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक असते. तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असेल आणि तुम्ही विना लायसन्स ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला ट्रॅफिक पोलीस पकडून तुमच्यावर विनापरवाना ड्रायव्हिंग केल्याबद्दल कारवाई करू शकतात. ही कारवाई आर्थिक दंडाच्या स्वरूपात केली जाते. अशा पोलीस कारवाईला सामोरे जायचे नसेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे खूप गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स हे बनवण्याच्या दोन प्रक्रिया आहेत ऑनलाईन प्रक्रिया व ऑफलाईन प्रक्रिया पण, आपण सदर लेखामध्ये ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आधारकार्ड वरून ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आधार कार्ड, पॅन कार्ड या दस्ताऐवजा बरोबरच ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालक परवाना हा दस्तावेज देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा रस्त्यावरून आपण वाहन चालवत असतो तेव्हा तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे आहे. ऑफलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आरटीओ ऑफिसचे हेलपाटे मारावे लागतात. ऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रोसेस ही एक वेळ खाऊ आणि जास्त पैसे देखील मोजावे लागतात.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
परंतु, ड्रायव्हिंग लायसन्स हे घरी बसून बनवता आले तर आरटीओ ऑफिस चे हेलपाटे वाचतील त्याचबरोबर वेळ व पैशाची देखील बचत होईल. घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा त्यावरील पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर, तुम्ही आधार ई-केवायसीचा वापर करू शकता. आधार ई-केवायसी चा वापर केला तर तुम्हाला टेस्टसाठी आरटीओ ऑफिस मध्ये जावे लागणार नाही. जर तुम्ही नॉन आधार ई-केवायसी चा वापर केला तर तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल. म्हणजेच तुम्हाला जर आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यायची नसेल तर तुम्ही आधार ई-केवायसी चा वापर करणे आवश्यक आहे.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
आधार ई-केवायसी चा वापर करून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
- घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर जावे लागेल. 👇🏼👇🏼👇🏼 https://parivahan.gov.in/parivahan//en/content/mparivahan#
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस या कॉलम मधील ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये अप्लाय फॉर लर्नर लायसन्स वर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आधार ई-केवायसीचा पर्याय निवडला तर तुम्हाला टेस्ट साठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या लर्नर लायसन्स साठी टेस्ट देऊ शकता.
- जर तुम्ही नॉन आधार ई-केवायसी पर्याय निवडला तर तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट देणे अनिवार्य आहे.
- पुढील स्टेप मध्ये तुम्हाला आधार ऑथेंटीकेशन हा पर्याय निवडून आधार नंबर द्यायचा आहे. त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर टाकून तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल.
- त्यानंतर आधार ई-केवायसी च्या माध्यमातून सर्व माहिती आपोआप भरली जाईल.
- जर तुम्ही नॉन आधार ई-केवायसी पर्याय ची निवड केली तर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ओटीपी देऊन लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Applicat Does Not Hold Driving/Learner Licence हा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या जवळच्या आरटीओ ऑफिसची निवड करा.
- त्यानंतर इतर आवश्यक माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा व स्लीप घेऊन लर्नर लायसन्स टेस्ट करता स्लॉट बुक करा.
- ऑनलाइन टेस्ट करता लॉग इन डिटेल्स एसएमएस द्वारे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर मिळतील. ऑनलाइन टेस्ट करता तुम्हाला आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागते.
- अशा पद्धतीने लर्नर लायसन्स अप्रूव्हल झाल्यानंतर प्रिंट लर्नर लायसन्स पर्यावर जाऊन ते डाऊनलोड करा.
अशा पद्धतीने तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवता येते.
ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर काय करायचे?
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्याची तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तक्रार नोंदवल्यानंतर सदर तक्रारीची एक प्रत तुमच्याजवळ ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला नोटरी कार्यालयामध्ये जाऊन एक प्रतिज्ञापत्र तयार करून घ्यायचे आहे. सदरच्या प्रतिज्ञा पत्रामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहेत अशा पद्धतीचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे.
सदर लेखांमध्ये आपण आधार ई-केवायसी चा पर्याय निवडून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कशी मिळवता येते? त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर काय करायचे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्हाला सुद्धा घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन मिळवणे सोपे आहे. धन्यवाद!