नमस्कार मित्रांनो, सदर लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योगासाठी 15 ते 35% पर्यंतचे अनुदान कसे घ्यायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग व सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून कर्ज दिले जाते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनालयामार्फत राबवली जाते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे स्वरूप
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रक्रिया उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 10 लाख रुपयापर्यंत या प्रकल्प मर्यादित कर्ज दिले जाते.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 25% अनुदान व शहरी भागासाठी 15% अनुदान दिले जाते. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 35% अनुदान व शहरी भागासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योग अनुदानाचे स्वरूप
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या अनुदानाचे स्वरूप काय आहे? हे आपण खाली पाहूया:
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार यांच्यासाठी शहरी भागातील बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या 25% अनुदान दिले जाते.
- ग्रामीण भागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार 35% अनुदानासाठी पात्र असतील.
- वरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना 5% स्वगुंतवणूक करावी लागते.
- या योजनेअंतर्गत उर्वरित सर्व प्रवर्गातील अर्जदार हे शहरी भागासाठी 15% व ग्रामीण भागासाठी 25% अनुदानासाठी पात्र असतील.
- याबरोबरच या लाभार्थ्यांना वरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 10% स्वगुंतवणूक करावी लागते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योग पात्रता
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योग अनुदानाचा लाभ घेऊन सुरू करण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्तीमध्ये पात्र होणे आवश्यक असते. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत? ते आपण खाली पाहूया:
- स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी सदर योजनेसाठी लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे वय 18 ते 45 वर्ष या दरम्यान असावे.
- सदर योजनेसाठी शिक्षण हे ₹10 लाखांवरील प्रकल्पासाठी किमान 7वी उत्तीर्ण, तर ₹25 लाखांवरील प्रकल्पासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग व माजी सैनिक यांच्यासाठी वयोमर्यादित 5 वर्षाची सवलत आहे.
- सदर योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- सदर योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळू शकतो.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योग आवश्यक कागदपत्रे
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहू:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण प्रमाणपत्र
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- जात प्रमाणपत्र (अर्जदार जात प्रवर्गातील असेल तर)
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराचे हमीपत्र
पशुखाद्य निर्मिती उद्योग अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योग अनुदानासाठी अर्ज ऑनलाईन करावा लागतो. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:
- सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👉🏽 https://maha-cmegp.gov.in/
- संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवरील New Registration या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, आधार कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती अचूकपणे भरा.
- नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर Apply या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरा जसे की वैयक्तिक तपशील, प्रकल्प माहिती इ.
- त्यानंतर सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व माहिती व अपलोड केलेली कागदपत्रे योग्य आहेत का? याची तपासणी करून Submit बटनावर क्लिक करा.
- अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट घ्या किंवा त्याची PDF फाईल सेव्ह करा.
अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योगासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
पशुखाद्य निर्मिती उद्योग व्यतिरिक्त इतर उद्योगांनाही या योजनेअंतर्गत मिळते अनुदान
पशुखाद्य निर्मिती उद्योगा व्यतिरिक्त बेकरी उत्पादने, फॅब्रिकेशन, चप्पल-बूट निर्मिती उद्योग इ. उद्योगासाठी 50 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी अर्ज करून अनुदान मिळवता येते. तर सेवा उद्योग व्यवसायासाठी यामध्ये सलून, रिपेरिंग व्यवसाय, ब्युटी पार्लर इ. व्यवसायांसाठी 10 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करून अनुदान मिळवता येते.
सदर लेखांमध्ये आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत पशुखाद्य निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते. त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही सुद्धा पशुखाद्य निर्मिती उद्योग व्यवसाय व्यतिरिक्त इतर कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर वरील माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगी पडेल. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!