व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा | how to apply floor mill scheme in Maharashtra.

मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करावा

मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. हा अर्ज आपल्याला ग्रामपंचायत किंवा जिल्हापरिषद येथे उपलब्ध असतो. काही अर्जाचे नमुने ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपण ते डाऊनलोड करून प्रिंट मारून अर्ज भरू शकता.

आम्ही आपल्या माहिती साठी सातारा आणि पुणे जिल्ह्याचे मोफत पिठाची गिरणी योजनेचे नमुना अर्ज खाली देत आहोत. आपण ते डाऊनलोड करून पाहू शकता.👈👈

मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇👇

मोफत पिठाची गिरणी योजना सातारा जिल्हा नमुना अर्ज PDF क्लिक करा .

मोफत पिठाची गिरणी योजना पुणे जिल्हा नमुना अर्ज PDF क्लिक करा.

अर्ज कोठे सादर करावा.

अर्ज मिळाल्यानंतर आपण अर्ज योग्य माहितीसह भरून आणि आवश्यक असलेली कागदपत्रे साक्षांकित करून सोबत जोडून घ्यावी.ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून सदर अर्जावरील प्रमाणपत्र भरून घ्यावे.त्यानंतर अर्ज आणि सोबत जोडलेले कागदपत्रे घेऊन जिल्हापरिषदे मध्ये जमा करावी.अर्जांची पडताळणी झाल्यानंतर आपण पात्र आहात का नाही हे कळवले जाईल.आपण जर मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असाल तर आपल्या खात्यामध्ये पिठाच्या गिरणीची ९०% रक्कम अनुदान म्हणून जमा केली जाईल.

हे वाचा-  भांडी संच योजना बांधकाम कामगारांना मिळणार आहेत घरातील भांडी मोफत. | बांधकाम कामगार योजना अर्ज करा.

FAQ : मोफत पिठाची गिरणी योजना संबंधित सतत विचारले जाणारे प्रश्न –

१) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ कोणत्या महिला वर्गाला मिळणार आहे?

उत्तर – मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ अनुसूचित जाती / जमाती वर्गातील महिलांना मिळणार आहे.

२) मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुषांना घेता येतो का?

उत्तर – मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ पुरुषांना घेता येत नाही , ही योजना फक्त महिलांसाठी आहे.

३) मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये गिरणी चालवण्यासाठी पुरुष काम करू शकतो ?

उत्तर- मोफत पिठाची गिरणी योजनेमध्ये लाभार्थी महिलेची इच्छा असेल तर ती पुरुष कामगार ठेऊ शकते.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

2 thoughts on “मोफत पिठाची गिरणी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा | how to apply floor mill scheme in Maharashtra.”

Leave a Comment