व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Pm kissan yojana; पी एम किसान चे पैसे येण्यासाठी बँक कशी बदलावी, घरातील किती जणांना मिळतो लाभ.

लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (pm kisan yojana) १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.  पीएम किसान योजनेचे पैसे मिळविण्यासाठी जर बँक खाते बदलाचे असेल, तर काय करायचे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो. त्यासाठीची प्रक्रिया समजावून घेऊ.


कुणाला मिळतो लाभ 


पीएम किसान सन्मान निधी योजना सुरूवातीला फक्त २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी मर्यादित होती, परंतु आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता या योजनेचा लाभ जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही जमीन अर्जदाराच्या नावावर १ जानेवारी २०१९ पूर्वी नोंदणीकृत असावी. याशिवाय, अर्जदाराचे बँक खाते, आधार कार्ड आणि NPCI शी लिंक असणे अनिवार्य आहे.

पी एम किसान चा सतरावा हप्ता झाला जाहीर. यावेळी मिळणार चार हजार रुपये.👇


 बँक खाते अपडेट कसे करतात?

पीएम किसान योजनेतील नवीन बँक खाते क्रमांक अपडेट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला ‘अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर्स’ या पर्यायावर जावे लागेल. हा पर्याय तुम्हाला होम पेजवरच दिसेल.
यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ‘डेटा मिळवा’ या पर्यायावर जा.
क्लिक केल्यानंतर, तुमचे सर्व तपशील तुमच्या समोर असतील.
येथे तुम्ही संपादन वर क्लिक करून तुमचे बँक खाते अपडेट करू शकता.

हे वाचा-  पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळाला नाही? असा करा चेक.. | पीएम किसान लाभार्थी यादी व स्टेटस पहा.

महाराष्ट्रातील सात लाख शेतकरी पीएम किसानच्या योजनेसाठी अपात्र, यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

कुणाच्या खात्यावर पैसे येत नाहीत?

  • शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमीन नसेल तर
  • कुटुंबातील एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • जर वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर
  • कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा अनिवासी भारतीय असले तर
  • कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर 
  • कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, सीए किंवा वकील असल्यास
  • पैसे का जमा होत नाहीत?
  • ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याला आधार लिंक केले नाही, ईकेवायसी केले नाही, काही कारणास्तव खाते बंद पडलेले आहे किंवा नोंदणी करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. 
  •  

पैसे खात्यावर येण्यासाठी काय कराल?


ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी करायची राहिली असेल अशा शेतकऱ्यांनी ईकेवायसी, आधार लिंक आणि बँक खाते सुरू आहे का याची खात्री करून घ्यावी. जरी १६वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसेल तरी ईकेवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे पुढच्या हप्त्यावेळी किंवा त्याआधी वितरीत करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण नाही.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment