व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपयांची आर्थिक मदत.

महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी नवी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” जाहीर केली आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे पुरवण्यात येणार आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेतील समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील काही अवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की राज्यातील ६५ वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करता यावी. वृद्धापकाळामुळे अनेकांना दिसण्यात, ऐकण्यात, आणि चालण्यात अडचणी येतात. या समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत आणि गरजेची उपकरणे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्थिक मदत

या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही रक्कम त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आर्थिक मदतीबरोबरच, त्यांना विविध आवश्यक उपकरणे देखील दिली जातात.

योजनेत मिळणारी उपकरणे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या उपकरणांची मदत केली जाते. यात खालील उपकरणांचा समावेश आहे:

  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • कमरेसंबंधीचा पट्टा
  • फोल्डिंग वॉकर
  • ग्रीवा कॉलर
  • स्टिक व्हीलचेअर
  • कमोड खुर्ची
  • गुडघा ब्रेस
  • श्रवणयंत्र इ.

पात्रता निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:

  1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  4. शारीरिक किंवा मानसिक त्रास असणे आवश्यक आहे.
  5. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
  6. राज्यातील किमान ३० टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करण्यात येणार आहे.
हे वाचा-  एक मेसेज करा, आधार कार्ड ला PAN कार्ड लिंक होईल | Aadhar PAN link

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र
  • समस्येचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना त्यांच्या वृद्धावस्थेत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे यांच्या साहाय्याने ज्येष्ठ नागरिकांना एक सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment