व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत, बांधकाम कामगारांना आता मिळणार घर बांधणीसाठी 2.50 लाख रुपयांचे अनुदान.. जाणून घ्या काय आहे गृहनिर्माण योजना?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Bandhkam kamgar Yojana Maharashtra 2025

नमस्कार, आपण या लेखांमध्ये बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांपैकी एक योजना म्हणजे गृहनिर्माण योजना याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये बांधकाम कामगारांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. बांधकाम कामगारांच्या या बहुमूल्य योगदानामुळेच राज्याने विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठी प्रगती केल्याचे दिसून येते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. या योजनेपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे गृहनिर्माण योजना होय.

बांधकाम कामगार योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

बांधकाम कामगारांना गृहनिर्माण योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

बांधकाम कामगारांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना घर बांधणीची जागा खरेदीसाठी 1 लाख रुपये आणि घर बांधकामासाठी 2,50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्याचबरोबर बांधकाम कामगारांना कर्ज सुविधाही उपलब्ध आहे. वरील अनुदानाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते.

आर्थिक सुरक्षेबरोबरच बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या इतर सुरक्षा व सहाय्य

बांधकाम कामगारांना गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते त्याचबरोबर इतर अनेक सुरक्षा व सहाय्य बांधकाम कामगारांना दिले जाते. ते आपण खाली पाहू:

सामाजिक सुरक्षा

  • अपघात विमा संरक्षण
  • जीवन विमा योजना
  • वृद्धापकाळसाठी पेन्शन योजना
  • मोफत आरोग्य विमा
हे वाचा ????  घरकुल लाभार्थ्यांना आता अतिरिक्त 50 हजार रुपयांचं अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा.

शैक्षणिक सुरक्षा किंवा सहाय्य

  • बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती
  • कौशल्य विकास कार्यक्रम
  • शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अनुदान
  • व्यावसायिक प्रशिक्षण

आर्थिक सुरक्षेबरोबरच बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा व बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सुरक्षा किंवा सहाय्य दिले जाते. अशा प्रकारच्या सुरक्षा व सहाय्य देऊन बांधकाम कामगारांसाठी बहुआयामी कल्याणकारी उपक्रम राबवत आहे.

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना पात्रता

बांधकाम कामगाराला गृहनिर्माण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक असते. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण खाली पाहू:

  • गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे अधिकृत नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बांधकाम कामगाराच्या नावावर स्वतःचे घर नसावे.
  • मागील वर्षभरामध्ये किमान 90 दिवस बांधकाम कामगारांनी बांधकाम क्षेत्रात काम केलेल्या असावे.
  • गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बांधकाम कामगाराने यापूर्वी अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना आवश्यक कागदपत्रे

बांधकाम कामगाराला गृहनिर्माण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जासोबत काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदर कागदपत्रे कोणती आहेत? ते आपण खाली पाहू:

  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड ओळखीच्या पुराव्यासाठी
  • बँक खाते तपशील
  • उत्पन्नाचा दाखला
  • कामगाराचा रोजगार पुरावा
  • जागा खरेदी/घर बांधणीसाठीचे दस्तऐवज (मागणी केल्यास)
हे वाचा ????  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नव्या शासन निर्णयाची माहिती

बांधकाम कामगार योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज हा दोन पद्धतीने करता येतो. ऑनलाईन व ऑफलाईन आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा? हे स्टेप बाय स्टेप पाहू:

ऑनलाइन अर्ज

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.???????????????? https://mahabocw.in
  • त्यानंतर होम पेजवर ‘योजना अर्ज’ किंवा ‘गृह योजना अर्ज’ हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमचा सर्व आवश्यक तो तपशील भरून योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • नंतर अर्ज सबमिट करून प्राप्त झालेला अर्ज क्रमांक जतन करा.

ऑफलाइन अर्ज

  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जावे लागले.
  • बांधकाम कामगार कार्यालयामधून गृहनिर्माण योजनेचा अर्ज घ्या.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
  • त्यानंतर अर्ज बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करा.

तुमच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर गृहनिर्माण योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

अशा पद्धतीने तुम्हाला बांधकाम कामगार गृहनिर्माण योजनेचा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येतो.

सदर लेखांमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी घरी बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणारी योजना म्हणजे गृहनिर्माण योजने विषयाची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही सुद्धा जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर वरील माहितीच्या आधारे गृहनिर्माण योजनेचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

हे वाचा ????  Ladki bahin yojana form/application status check | लाडकी बहीण योजनेचा फॉर्म स्वीकारला आहे की रिजेक्ट केला आहे पहा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page