व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

BSNL च्या प्लॅनसमोर Jio-Airtel विसरुन जाल; मिळणार दररोज 2GB डेटा अन् 395 दिवसांची व्हॅलिडिटी

Jio आणि Airtel ने आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे अनेक ग्राहक BSNL मध्ये पोर्ट करत आहेत.

दररोज 2GB डेटा अन् 395 दिवसांची व्हॅलिडिटी;

BSNL 395 Days Plan: Jio, Airtel आणि Vodafone Idea (vi) सारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. याचा फायदा घेत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच देशभरात 4G सेवा सुरू करणार असून, त्यांनी स्वस्त प्लॅन्सदेखील लॉन्च केले आहेत. खासगी कंपन्यांच्या वाढीव रिचार्जमुळे अनेक ग्राहक BSNL मध्ये पोर्ट करत आहेत.

देशभरात 4G सेवा सुरू झाल्यानंतर अधिक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बीएसएनएलच्या एका प्लॅनची सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे. हा प्लॅन 395 दिवसांचा आहे. यामध्ये मिळणारे बेनिफिट्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हा इतर कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.

BSNL चा 395 दिवसांचा प्लॅन

बीएसएनएलचा 395 दिवसांचा प्लॅन 2,399 रुपयांना मिळतो. यामध्ये यूजरला दररोज 2 GB डेटा मिळतो आणि देशभरातील सर्व नेटवर्क्सवर अमर्यादित व्हॉईस कॉलचा लाभ मिळेल. याशिवाय 100 एसएमएसची सेवाही उपलब्ध आहे. याशिवाय, झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर अरेना गेम्स आणि गेमऑन ॲस्ट्रोटेल सारख्या सेवादेखील उपलब्ध असतील.

हे वाचा-  सोलर पॅनलसोबत बॅटरीवर मिळणार का सबसिडी,जाणून घ्या सविस्तर | can solar subsidy also available for battery.

Jio-Airtel चे प्लॅन

Jio आणि Airtel कडे असाच प्रीपेड प्लॅन आहे, परंतु त्याची किंमत BSNL पेक्षा खूप जास्त आहे. या दोन्ही कंपन्या 3599 रुपयांमध्ये 365 दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅनमध्ये एअरटेल दररोज 2 जीबी डेटा देत आहे, तर जिओ दररोज 2.5 जीबी डेटा देत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही कंपन्या यूजर्सना 5G सेवा देत आहेत. याबाबतीत BSNL सध्या खूप मागे आहे. पण, लवकरच बीएसएनएल अपडेट होणार आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment