व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 2024 | free floor mill scheme Maharashtra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे “महिला व बालकल्याण विभागामार्फत” राज्यातील अनुसुचित जाती / जमाती मधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांना पिठाची गिरणीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. 

तरी या योजनेसाठी आपण लवकरात लवकर फॉर्म भरावा.

 आम्ही या पोस्ट मध्ये आपल्याला मोफत पिठाची गिरणी योजने बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. त्यासाठी आपण शेवटपर्यंत ही पोस्ट वाचा.

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना विशेष करून ग्रामीण भागात राहण्याऱ्या महिलांसाठी सुरू केली आहे. सध्या या योजनेचा लाभ शहरातील गरजू आणि गरीब महिलांसाठी मिळेल की नाही या गोष्टीची अजून माहिती प्राप्त झालेली नाही.राज्यामध्ये पिठाची गिरणी योजना मागील काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. आणि या योजनेअंतर्गत खूप महिलांनी पिठाची गिरणी मोफत मिळवली आहे. ही योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास व आर्थिक परिस्थितीने सक्षम होण्यास मदत करत आहे.

मोफत पिठाची गिरणी अनुदान योजना काय आहे 

( Mofat pithachi girani yojna kay aahe )महाराष्ट्र राज्यात शासनाकडून मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती / जमातीच्या महिलांसाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी अनुदान दिले जाते. गिरणीच्या कोटेशन/बिलावर ९०% सबसिडी दिली जाते. १०% रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते. या गिरणीचा उपयोग महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळून त्यांचे जीवनमान उंचावते. महिलांनी आत्मनिर्भर
बनावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

हे वाचा 👉  Agri Business Loan: शेती व्यवसायासाठी सहज कर्ज मिळवा, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

मोफत पिठाची गिरणी योजनेचे ठळक मुद्दे

योजनेचे नाव

मोफत पिठाची गिरणी योजना

योजना राबवणारे राज्य

महाराष्ट्र

कोणी सुरू केली

मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य)

विभाग

महिला व बालकल्याण विभाग

लाभार्थी

महिला (अनुसूचित जाती/जमाती)

उद्देश

महिलांना आत्मनिर्भर बनविणे

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात

या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला खलील कागदपत्रांची आवश्यकता आहे :

  • विहित नमुन्यातील मागणी अर्ज
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रेशनकार्ड
  • पीठ गिरणी खरेदीसाठी प्रमाणित रिपोर्ट
  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • वीजबिल
  • पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा
  • व्यवसायासाठी जागेचा “८ अ नमुना”

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अनुसूचित जाती / जमाती या वर्गातील महिला या योजनेसाठी पत्र आहेत.
  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांनाच मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल.
  • ज्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल अशा कुटुंबातील महिला मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असेल.
  • आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.
  • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी १८ ते ६० वयोगटातील मुली/महिला पात्र असतील.

मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page