व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मागेल त्याला Solar Pump योजनेचा लाभ घ्या.

शेतीसाठी पाणीटंचाई आणि विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचन करताना अडचणी येतात. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदानित दरात Solar Pump उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना विजेच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार नाही आणि दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.

Solar Pump योजनेचे फायदे

Solar Pump योजनेतून शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळणार आहेत –

  • सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा: सौरऊर्जेच्या मदतीने वीज उपलब्ध होईल, त्यामुळे विजेवरील खर्च कमी होईल.
  • डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल: पारंपरिक डिझेल पंपांवर होणारा अतिरिक्त खर्च वाचेल.
  • पर्यावरणपूरक उपाय: सौरऊर्जेचा वापर केल्याने प्रदूषण कमी होईल आणि शेती अधिक शाश्वत होईल.
  • दिवसा सिंचन करण्याची सुविधा: विजेच्या भारनियमनामुळे रात्री सिंचन करण्याची वेळ टाळता येईल.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

योजनेसाठी पात्रता निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे –

  1. सिंचनासाठी पाणी स्रोत असणे आवश्यक: शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्याच्या जवळील शेतकरी पात्र ठरतील.
  2. महावितरणची पडताळणी: शेतकऱ्यांचा पाणी स्रोत शाश्वत असल्याचे महावितरणकडून तपासले जाईल.
  3. पूर्वी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा: “अटल सौर कृषी पंप योजना” किंवा “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा” लाभ घेतलेले शेतकरी अर्ज करू शकणार नाहीत.
हे वाचा 👉  पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता जमा – अजून पैसे मिळाले नाहीत? Check pm kisan beneficiary status and list

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Solar Pump योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे द्यावी लागतील –

  • ७/१२ उतारा (पाण्याचा स्रोत नमूद असणे आवश्यक)
  • मालकी हक्क दर्शविणारा ना हरकत दाखला
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती-जमाती किंवा इतर मागास प्रवर्गासाठी)
  • डार्क झोन प्रमाणपत्र (जर पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असेल)

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानित दरात Solar Pump प्रदान केला जाईल.

Note – कागदपत्रे pdf फाईल मध्ये अपलोड करावीत ज्यांची साइज ५०० KB पेक्षा जास्त नसावीत.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला अर्ज करण्यासाठी अधिकृत Solar MTSKPY पोर्टल जा त्यानंतर लाभार्थी सुविधा या टॅब वर क्लिक करून अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, जलस्तोत्र / सिंचन माहिती, कृषी तपशील, अगोदर असलेल्या पंपाचा तपशील, लागणाऱ्या पंपाचा तपशील, बँक तपशील, घोषणापत्र आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज Submit करा.
  • अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला पोचपावती मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता आणि रक्कम भरणा करू शकता.
हे वाचा 👉  राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून तब्बल 50 वर्षानंतर ७/१२ उताऱ्यात करण्यात आले 11 बदल.. जाणून घ्या काय आहेत हे बदल!|Satbara Utara New updates 2025

हेल्पलाइन नंबर

एखाद्या शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास त्यांनी तालुकास्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. ते महावितरणच्या केंद्रीय ग्राहक सेवा केंद्राशीही संपर्क साधू शकतात. मदतीसाठी शेतकरी १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतात.

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

Solar Pump योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज उपलब्ध होणार असून, डिझेलवरील अवलंबित्व कमी होणार आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकरी स्वस्त, शाश्वत आणि प्रदूषणमुक्त ऊर्जेचा वापर करू शकतील.

शेतकऱ्यांनी ही सुवर्णसंधी साधावी आणि आपल्या शेतीला सौरऊर्जेच्या मदतीने समृद्ध करावे!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page