व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Gold Loan : गोल्ड लोन कसा घ्यायचा? काय आहेत गोल्ड लोनचे फायदे तोटे, पहा संपूर्ण माहिती

Gold Loan : देशातील अनेक नागरिक सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यात पैसे गुंतवत असतात. सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा देखील मिळतो. सध्या सोने आणि चांदीचे दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्यांना चांगले दिवस आले आहेत.

सोन्यामध्ये गुंतवणूक करणे कधीही फायचेच ठरत आहे. कारण तुम्ही ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी करत आहात त्या दिवसांनंतर सोन्याचे दर वाढलेलेच पाहायला मिळत आहेत. त्यामुळे यामध्ये एक चांगला होत आहे.

सोने विकत असताना खरेदी केलेल्या भावापेक्षा जास्त दराने विकले जाते. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होत आहे. सोन्याच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे.

काही वेळा पैशांची गरज असते मात्र पैसे नसतात आणि तुमच्याकडे सोने असते. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही सोन्यावर कर्ज घेऊ शकता. तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमचे सोने खरेदी करू शकता.

विनातारण एक लाख रुपयांचा लोन घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

गोल्ड लोन कसा घ्यायचा ?

तुम्हालाही तुमच्याकडील सोन्यावर कर्ज घेईचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडे जावे लागेल. यानंतर तुम्हाला या वित्तीय संस्थांकडून सोन्यावर कर्ज दिले जाईल. यासाठी तुम्हला जास्त कागदपत्रांची गरज नाही.

तुम्ही सोन्यावर कर्ज घेतले तर तुमच्या पैशांची गरज भागू शकते. मात्र नंतर तुम्ही वेळेवर परतफेड केली तर तुम्ही तुमच्या सोन्याचे दागिने पुन्हा मिळवू शकता. सोन्यावर कर्ज देणाऱ्या काही वित्तीय संस्था…

  • मुथूट फायनान्स
  • मणप्पुरम फायनान्स
  • युनियन गोल्ड लोन
  • SBI गोल्ड लोन
  • महिंद्रा गोल्ड लोन
  • ICICI गोल्ड लोन
  • एचडीएफसी गोल्ड लोन
हे वाचा-  पोस्टाच्या 'या'योजनेत गुंतवाल पैसे तर कमवाल 2 लाख रुपये व्याज मिळेल कर सवलत आणि बरच काही......

या वित्तीय संस्थांना भेट देऊन सोने तारण कर्जाविषयी माहिती घेऊ शकता. तसेच या संस्था तुम्हाला गोल्ड लोन देऊ शकतात. याठिकाणी तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांमध्ये सोने तारण कर्ज दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

ही कागदपत्र घेऊन तुम्ही सोने तारण ठेवणाऱ्या संस्थांकडे जाऊ शकता. तसेच तुमच्याकडे किती सोने आहे आणि त्याची शुद्धता यावर कर्ज किती मिळणार हे अवलंबून असते. जास्त सोने असेल तर तुम्हाला जास्त देखील कर्ज मिळू शकते.

सोने न ठेवता लोन कसा मिळवायचा याबाबत संपूर्ण माहिती पहा.

गोल्ड लोनचे फायदे

गोल्ड लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. घरात ठेवलेले सोने तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही वित्तीय संस्थांकडून गोल्ड लोन घेऊ शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला पैशांची मदत होईल.

जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी गेला तर तुम्हाला ते कर्ज कशासाठी घेतले जात आहे हे सांगावे लागते. मात्र सोने कर्ज घेताना तुम्हाला कशासाठी घेत आहेत हे सांगणे गरजेचे नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोने कर्जावरील पैसे वापरू शकता.

बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेण्यासाठी गेला तर त्याचे व्याजदर हे खूपच असते. त्यामुळे ते अनेकांना शक्य होत नाही. जर तुमच्याकडे सोने असेल तर त्यावर कर्ज घेऊ शकता. या कर्जावर सर्वात कमी व्याजदर आकारले जाते. त्यामुळे त्याची परतफेड सहजपणे करू शकता.

हे वाचा-  Farm Loan: 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत पहा.

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सतत फेऱ्या माराव्या लागतात. मात्र गोल्ड लोन घेण्यासाठी तुम्हाला जास्त फेऱ्या मारण्याची गरज नाही. कारण तुम्हाला २ ते ३ दिवसांत असणे कर्ज मिळू शकते. यासाठी तुमचा CIBIL स्कोअर पाहिला जात नाही.

गोल्ड लोनचे तोटे

गोल्ड लोनचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. त्यामुळे फायद्यांसोबतच तुम्हाला तोटेही जाणून घेईची गरज आहे.

तुम्ही जेव्हा सोन्यावर कर्ज घेता त्यानंतर तुम्हाला त्यावरील कर्जाची परतफेड करताना वेळेवर करावी लागते. अन्यथा तुमच्याकडून दंड देखील आकाराला जाऊ शकतो. दिलेल्या वेळेत कर्ज न भेटल्यास तुम्ही ज्या सोन्यावर कर्ज घेतलेले आहे ते सोने जप्त केले जाते.

सोन्यावर कर्ज घेणं अगदी सोपे आहे मात्र परतफेड करणे थोडेसे अवघड आहे. कारण सोन्यावरील कर्जाची परतफेड करण्यासाठी कमी कालावधी दिला जातो. या कालावधीमध्ये परतफेड करणे गरजेचे असते.

सोन्यावर कर्ज घेत असताना तुम्ही पूर्णपणे माहिती घेणे आवश्यक आहे. सोने कर्ज घेत असताना तुमच्याकडून व्याजासह इतर चार्जेसही घेतले जातात. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

गोल्ड लोन कसा फेडला जातो?

गोल्ड लोन फेडण्याचे दोन मार्ग आहेत, परंतु यापैकी कोणती पद्धत तुमची संस्था अवलंबणार, हे तुमच्या संस्थेवर अवलंबून असेल. यातील पहिला मार्ग म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जात व्याज मिसळून तुम्हाला मासिक हप्ता दिला जातो.

हे वाचा-  सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि तुमचे सोने कर्ज जमा होत जाते. दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही दरमहा फक्त व्याजाची रक्कम भरत रहा आणि मूळ रक्कम तुमच्याकडे पैसे आल्यानंतर एकत्र भरा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment