व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप माहिती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा याची माहिती

१) जमिनीचा नकाशा ऑनलाइन काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in वर सर्च करावे.

किंवा जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

—–

२) त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, ‘कॅटेगरी’मध्ये रुरल (ग्रामीण) आणि अर्बन (शहरी) असे दोन पर्याय दिसतील. तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडावा.

—-

३) तिसऱ्या टप्प्यावर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करावे. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्हाला हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहता येईल.

४) त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसतात, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जाता येईल.

असा काढता येईल जमिनीचा नकाशा…

नकाशाच्या पेजवर search by plot number या नावाचा रकाना असून तेथे तुमच्या सातबारावरील गट क्रमांक टाका. त्यानंतर जमिनीचा गट नकाशा ओपन होतो. ‘होम’ या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करा आणि वजाबाकीचे (-) बटण दाबून पूर्ण नकाशा पाहू शकता. त्यानंतर डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची माहिती दिसेल.

हे वाचा 👉  Create phonepe new account using Aadhar card| विना ATM card आधार कार्डच्या मदतीने नवीन PhonePe अकाउंट कसे उघडावे? संपूर्ण माहिती.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती पाहता येईल. ही माहिती पाहिल्यावर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या जमिनीचा plot report दिसेल. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक करा आणि तुम्ही नकाशा डाऊनलोड करू घ्या.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page